रोहित अन् विराट उद्या रचणार इतिहास (फोटो - सोशल मिडिया)
रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये वनडे सिरिज खेळत आहेत. दोन्ही सामन्यात रोहित शर्मा चांगली खेळी करू शकलेला नाहीये. पाहिलोय सामन्यात 11 तर दुसऱ्या सामन्यात 26 रन्स करून तो आउट झाला. तर विराट कोहली 5 आणि दुसऱ्या सामन्यात 65 रन्सवर आउट जल. मात्र आता ही जोडी लॉर्डस मैदानावर एक नवा विक्रम रचणार आहेत.
लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर
रोहित शर्मा आणि विराट कोहली लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर आपला 400 वा वनडे सामना खेळणार आहेत. जी जोडी एकत्रित 400 वा सामना खेळणार आहे. दोघांचा हा 400 वा इंटरनॅशनल क्रिकेट सामना असणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच दोन खेळाडूंनी एकत्रित 400 सामने खेळल्याची नोंद नाहीये. त्यामुळे उद्या विराट आणि रोहित नवा विक्रम आपल्या नावावर करतील.
विराट आणि रोहितची जोडी भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारी जोडी आहे. काही कालावधी आधी त्यांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरकहा रेकॉर्ड मोडला होता. क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेचे खेळाडू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी एकत्रित 500 सामने खेळले आहेत. हा रेकॉर्ड इतके सोपे नसणार आहे. त्यामुळे उद्याचा सामना रोहित आणि विराटसाथी खास असणार आहे.
IND Vs ENG Live: क्रिकेटच्या ‘किंग’चे इंग्लंडमध्ये वादळ; Virat Kohli ने मोडला द्रविडचा ‘हा’ रेकॉर्ड
‘रोहितवर कोणताही प्रकारचा दबाव नाही…’
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, जेव्हा फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांना विचारण्यात आले की, भारतीय संघ सलामीवीर म्हणून रोहित शर्माऐवजी यशस्वी जैस्वाल किंवा ईशान किशन यांना संधी देण्याचा विचार करत आहे का, तेव्हा त्यांनी रोहितचा बचाव करत म्हटले, ‘मला नाही वाटत की रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू कोणत्याही दबावाखाली येऊ शकतो. तो इतका महान खेळाडू आहे की या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही.






