Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma Ended Retirement Rumours: इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोरदार सुरु होती. परंतु आता स्वत: रोहित शर्माने यावर मौन सोडले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 20, 2026 | 03:55 PM
‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
Follow Us
Follow Us:
  • निवृत्तीच्या अफवांवर रोहित शर्माचे प्रत्युत्तर
  • रोहित विराट कोहलीबद्दल काय म्हणाला?
  • मैदानावर बॅटने धावा करणे हे माझे काम
इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली. त्याने एका शानदार शतकाने आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. भारतीय संघाने २७ धावांनी हा सामना गमावला. पण रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला. रोहितने ११० चेंडूवर १३८ धावा केल्या. लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यापूर्वी, हा सामना रोहितचा शेवटचा असू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरु होती. परंतु, आता खुद्द ‘हिटमॅन’ने या वृत्तांवर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

‘गोल मशीन’ एम्बाप्पे! ट्रॉफी हुकली, पण सलग दुसऱ्यांदा जिंकला FIFA वर्ल्ड कपचा गोल्डन बूट

निवृत्तीच्या अफवांवर रोहित शर्माचे प्रत्युत्तर

लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यापूर्वी, रोहितच्या संभाव्य शेवटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बरीच चर्चा सुरु होती. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल असे वाटत होते, मात्र बीसीसीआयने असे वृत्त फेटाळून लावले होते. परंतु, त्यानंतर रोहितने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून आपल्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

लॉर्ड्सवर शतक झळकावल्यानंतर रोहितने बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मैदानावर बॅटने धावा करणे हे माझे काम आहे. माझ्या देशाचे आणि माझ्या संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे काम आहे. मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मला हेच करण्यास सांगितले गेले आहे आणि मी ते करत राहीन. मी पदार्पण केल्या पासून, माझ्या निवृत्तीबद्दल आणि माझ्या फॉर्मबद्दल बाहेरील जगात चर्चा होत आहे आणि जोपर्यंत मी येथे क्रिकेट खेळत आहे, तोपर्यंत या चर्चा नेहमीच होणारच आहेत. त्यामुळे, यापैकी कशाचीही मला फारशी पर्वा नाही

रोहित पुढे म्हणाला की, ‘माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मैदानावर काय करतो आणि माझ्या संघाच्या विजयात मी किती योगदान देऊ शकतो. सध्या माझे संपूर्ण लक्ष त्यावरच आहे. बाहेरच्या चर्चांना होऊ द्या, कारण थोडा गोंधळ असेल तर मजा कशी येणार? मैदानावर खेळणे हे माझे काम आहे आणि बाहेरच्यांचे काम गप्पा मारणे आहे; मी याकडे असेच पाहतो.’

He was the most-talked about cricketer before the Lord’s ODI and he still remains the most-talked about after his scintillating hundred 🙌 🎥 Hear from the man himself as he soaked everything in to produce a masterclass 🫡 – By @RajalArora #TeamIndia | @ImRo45… — BCCI (@BCCI) July 20, 2026

रोहित विराट कोहलीबद्दल काय म्हणाला?

या संभाषणादरम्यान, रोहितने कोहलीसोबतच्या आपल्या नात्याबद्दलही सांगितले. तो म्हणाला की, ‘आम्ही आमची संपूर्ण कारकीर्द एकत्र खेळलो आहोत, त्यामुळे विराटसोबत मैदानावर असणे खूप छान वाटते. आमच्या अनेक उत्तम भागीदारी झाल्या आहेत आणि एकत्र फलंदाजी करणे नेहमीच मजेशीर असते. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. मैदानावर नवीन टिप्स शेअर करत असतो. आपण आणखी काय चांगले करू शकतो याचा विचार करणे हा नेहमीच एक उत्तम अनुभव असतो.’

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

Web Title: Rohit sharma breaks silence on retirement rumours after lords century virat kohli partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • bcci
  • IND Vs ENG
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’
1

त्रास द्यावा पण किती? World Cup जिंकून दिल्यानंतर डच्चू कसा? Suryakumar Yadav म्हणाला, ‘… मी शांत होतो’

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL
2

Ananya Bangar: काय आहे Gender Affirming Surgery, अनन्या बांगर ऑस्ट्रेलियात खेळणार WBBL

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
3

Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?
4

IND Vs AFG: पठाणांचा गेम होणार! लवकरच Team India ची घोषणा होणार, मात्र ‘या’ खेळाडूला संधी नाहीच?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.