Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishabh Pant : कार दुर्घटनेतून परतलेल्या ऋषभ पंतला खास पुरस्कारासाठी नामांकन; ‘या’ खेळाडूंचेही नाव सामील…

भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंतला एका खास पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ऋषभ पंत याने भीषण कार अपघातांतर भारतीय क्रिकेट संघात जोरदार पुनरागमन केले आहे. 

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 03, 2025 | 09:27 PM
Rishabh Pant: Rishabh Pant, who returned from a car accident, nominated for a special award; 'These' players' names are also included...

Rishabh Pant: Rishabh Pant, who returned from a car accident, nominated for a special award; 'These' players' names are also included...

Follow Us
Follow Us:

Rishabh Pant : भारतीय संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे असल्यामुळे भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत आयोजित करण्यात आले आहेत. भारतीय संघाने साखळी फेरीत सलग तीन सामने जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. या संघात ऋषभ पंतचाही समावेश आहे. त्याला एका खास पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. त्यांतर ऋषभ पंतने भारतीय संघात जोरदार  पुनरागमन केले होते. त्यानंतर ऋषभ पंतने मागे वळून पहिलेच नाही. त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. अशातच पंतला आता ‘कमबॅक प्लेअर ऑफ द इयर’ म्हणून नामांकन मिळाले आहे. ऋषभ पंतला ‘कमबॅक ऑफ द इयर’ साठी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 साठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार सोहळा माद्रिद येथे २१ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

 2022 मध्ये पंतचा भीषण अपघात…

ऋषभ पंतचा 30 डिसेंबर 2022 रोजी दिल्लीहून त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असताना भीषण कार अपघात झाला होता. डेहराडूनमधील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर, 27 वर्षीय ऋषभला मुंबईला हलवण्यात आले होते. जिथे बीसीसीआयच्या तज्ञ सल्लागाराच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. ऋषभ पंतच्या  उजव्या गुडघ्याच्या तीनही अस्थिबंधांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. नंतर पंतने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आपले पुनर्वसन पूर्ण केले.

हेही वाचा : IPL 2025 : अखेर KKR ला नवीन कर्णधार मिळाला; ‘या’ मराठमोळ्या खेळाडूकडे सोपविली संघाची धुरा..

जीवघेण्या दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतने मागील वर्षी मुल्लांपूर येथे पंजाब किंग्ज विरुद्ध त्याच्या तत्कालीन आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससाठी मैदानात उतरले होते. त्यानंतर पंतने आपल्या खेळाच्या बळावर कसोटी क्रिकेटमध्ये विजयी पुनरागमन करून  कार अपघातानंतर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दमदार शतक झळकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्या सामन्यात भारताला 280 धावांनी विजय मिळवता आला होता.

नामांकन मिळालेले खेळाडू :-

  1. कॅलेब ड्रेसेल (यूएसए) स्विमिंग : पॅरिसमध्ये दोन रिले सुवर्ण आणि एक रौप्य जिंकण्यासाठी मानसिक आरोग्याच्या समस्यांवर मात
  2. रेबेका अँड्रेड (ब्राझील) जिम्नॅस्टिक्स : दुखापतीशी लढताना तिने ऑलिम्पिक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकले
  3. मार्क मार्केझ (स्पेन) मोटर साइकिलिंग : गंभीर दुखापतीतून बरे होऊन 2024 मध्ये तीन ग्रँड प्रिक्स जिंकणे
  4. लारा गुट-बेहरामी (स्वित्झर्लंड) अल्पाइन स्कीइंग : 2015/16 हंगामानंतर प्रथमच एकूण विश्वचषक विजेतेपद जिंकले.
  5. ऋषभ पंत (भारत) क्रिकेट :  प्राणघातक कार अपघातानंतर ६२९ दिवसांनी, भारताच्या कसोटी संघासाठी खेळण्यासाठी परतला
  6. एरियन टिटमस (ऑस्ट्रेलिया) जलतरण : ट्यूमर निदानानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये तिच्या ऑलिम्पिक 400 मीटर फ्रीस्टाइल विजेतेपद राखले
हेही वाचा : Champion Trophy 2025 : दुबईच्या खेळपट्टीचा भारतालाच फायदा! दिग्गजांकडून आक्षेप; रोहित शर्माने सोडलं मौन, दिलं चोख उत्तर, म्हणाला..

ऋषभ पंतची क्रिकेट कारकीर्द..

ऋषभ पंतने आजवर  43 कसोटी सामन्यात 2948 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पंतने 31 सामने खेळले असून 27 डावांमध्ये त्याने 871 धावा केल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 76 सामन्यात 1209 धावा केल्या आहेत. त्याच्या आयपीएल करियरबद्दल सांगायच झालं तर त्याने आयपीएलमध्ये 111 सामन्यांमध्ये 3284 धावा केल्या आहेत.

 

Web Title: Rushabh pant got nominated a special award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 09:24 PM

Topics:  

  • bcci
  • Car Accident
  • Champion Trophy 2025
  • ICC
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…
1

IND Vs BAN: ‘टीम इंडिया’ बांगलादेशला जाणार की नाही? तमीम इक्बाल म्हणाले…

ICC vs Trump : अमेरिकेने ICC प्रमुखांवर निर्बंध लादले; न्यायालयाने म्हटले ‘स्वातंत्र्यावर उघड हल्ला’
2

ICC vs Trump : अमेरिकेने ICC प्रमुखांवर निर्बंध लादले; न्यायालयाने म्हटले ‘स्वातंत्र्यावर उघड हल्ला’

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड
3

Rishabh Pant: ऋषभ पंतने रचला इतिहास! WTC मध्ये शुभमनला मागे सोडून बनला नंबर 1, अप्रतिम रेकॉर्ड

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…
4

IND Vs SL: श्रीलंकेचे जहाज बुडणार? Rishabh Pant चा 100 सिक्सचा ऐतिहासिक रेकॉर्ड, पहिला भारतीय अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.