केशव महाराज(फोटो-सोशल मीडिया)
SA vs ENG : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. फिरकी गोलंदाज केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या या विजयाचा हीरो ठरला. केशव महाराजांनी ४ विकेट्स घेऊन त्याने या विजयात मोठी भूमिका बजावली.तसेच या कामगिरीसह त्याने इतिहास रचला.
लीड्समध्ये खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात केशव महाराजने ५.२ षटकांत २२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. महाराजच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर संपूर्ण इंग्लंड संघ १३१ धावांवर रोखने दकशिबन आफ्रिकेला सोपे गेले. या कामगिरीने महाराजने मोठी कामगिरी केली. त्याने इंग्लंडमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये किमान चार विकेट्स घेऊन केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. महाराजापूर्वी चार दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज असे करण्यात यशस्वी ठरले आहेत.
त्यांच्यापूर्वी केवळ चार दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाना अॅलन डोनाल्ड, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा आणि एनरिक नोर्किया हे असे करण्यात यश आले याहे. या सर्वांनी एका डावात किमान चार विकेट्स झटकवल्या आहेत. खरं तर, महाराजांचे हे आकडे इंग्लंडमध्ये २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने केलेली दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी दर्शवत आहेत.
हेही वाचा : महिला विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ घोषित! संधी मिळालेल्या ‘या’ १७ वर्षीय विकेटकीपरची होतेय चर्चा..
केशव महाराज २२ धावा देत ४ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या या कांगिरीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजाने सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीचा इम्रान ताहिरचा विक्रम देखील मोडीत काढला आहे. ६ मार्च २०११ रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये इम्रान ताहिरने ८.४ षटकांत ३८ धावा देत चार इंग्लिश फलंदाजांना माघारी पाठवण्यात यश मिळवले होते.
महिला विश्वचषक २०२५ साठी दक्षिण आफ्रिकेच्या संघ जाहीर करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपासून महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आफ्रिकन महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात १७ वर्षीय तरुण यष्टीरक्षक-फलंदाज कराबो मेसोचा देखील समावेश करण्यात अल आहे. संघात संधी देण्यात आलेल्या १७ वर्षीय मेसोने या वर्षी मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वरिष्ठ संघात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी दोन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळलेले आहेत. २०२३ आणि २०२५ मध्ये दोन अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर मेसो तिच्या पहिल्या वरिष्ठ विश्वचषकात खेळणार आहे.