Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेव्हा मैदानावर उतरले नेते अन् कलाकार! चौकार-षटकारांसोबत ‘ॲक्टिंग’ आणि कॉमेडीचा तडका; सांगलीत…

अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेमुळे सांगलीतील क्रिकेट मैदानावर अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीचे तारांगण अवतरले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 03:45 PM
जेव्हा मैदानावर उतरले नेते अन् कलाकार! चौकार-षटकारांसोबत ‘ॲक्टिंग’ आणि कॉमेडीचा तडका; सांगलीत…
Follow Us
Follow Us:
  • ‘विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग’मध्ये समर्थ सांगलीकरचा विजय
  • आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्याहस्ते बक्षीस वितरण
  • ‘समर्थ सांगलीकर’चा विजेतेपदावर कब्जा तर ‘नवराई’ उपविजेता
पुणे: सांगली येथील भारती विद्यापीठाच्या प्रांगणात आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ला रसिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहाटेपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत कॅप्टन ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ सांगलीकर’ संघाने विजेतेपद पटकाविले, तर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘नवराई’ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यातील अटीतटीच्या लढतीत ‘समर्थ सांगलीकर’ संघाने ‘नवराई’ संघाचा अवघ्या ८ धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अत्यंत रोमांचक वातावरणात झालेल्या या सामन्यांनी क्रिकेटप्रेमी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चाहत्यांना अक्षरशः खिळवून ठेवले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दर्दी रसिकांनी मोठी गर्दी केली होती.स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. विजेत्या व उपविजेत्या संघांसह संघमालकांनी एकच जल्लोष करत या संस्मरणीय विजयाचा आनंद साजरा केला.

किरकोळ दुखापतीने उघड केला १० वर्षांपासूनचा लपलेला आजार; क्रिकेटपटूचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल

७० हून अधिक कलाकारांचा सहभाग

अभिजीत कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित या भव्य स्पर्धेमुळे सांगलीतील क्रिकेट मैदानावर अक्षरशः मराठी चित्रपटसृष्टीचे तारांगण अवतरले होते. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता सिद्धार्थ जाधव, स्नेहल तरडे, शशांक केतकर, सौरभ गोखले, हार्दिक जोशी, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यासह ७० हून अधिक मराठी चित्रपट कलाकारांनी या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला.

हे ठरले सिरीजमधील ‘बेस्ट’
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकार-खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब यांना सन्मानित करण्यात आले. संजय जाधव यांना ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरविण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अभिनेत्री प्रतिक्षा जाधव हिची निवड झाली. प्रवीण तरडे यांना उत्कृष्ट यष्टिरक्षकाचा पुरस्कार, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ‘राणादा’ अर्थात अभिनेता हार्दिक जोशी याला सन्मानित करण्यात आले.

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

डॉ. विश्वजीत कदम विरुद्ध प्रवीण तरडे संघाचा सामना ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू
या क्रिकेट लीगमधील सर्वात रंगतदार आणि लक्षवेधी सामना म्हणजे आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखालील आमदार-खासदारांचा संघ आणि कॅप्टन प्रवीण तरडे यांच्या नेतृत्वाखालील कलाकारांचा संघ यांच्यातील विशेष सामना ठरला. या सामन्यात नाणेफेक जिंकून डॉ. विश्वजीत कदम यांच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मैदानावर चौकार-षटकारांच्या फटकेबाजीसोबतच झेलबाद, झेल सोडण्याची ‘अॅक्टिंग’ आणि नो-बॉलमुळे निर्माण झालेली मजेशीर परिस्थिती यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले. डॉ. विश्वजीत कदम यांच्या संघाकडून स्वतः डॉ. कदम यांच्यासह खा. विशाल पाटील, धैर्यशील माने, आ. रोहित पाटील, आ. सुहास बाबर, आ. सत्यजीत देशमुख, आ. राहुल आवाडे आणि विशेष म्हणजे उद्योजक संजय घोडावत यांनी मैदानात उतरून खेळाचा आनंद घेतला. या संघाने सर्वाधिक १३० धावांची विक्रमी धावसंख्या उभारत सामन्यात रंगत निर्माण केली.

Web Title: Samarth sanglikar wins vishwajeet marathi celebrity cricket league actors and politicians sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Dr. Vishwajeet Kadam
  • sangli news

संबंधित बातम्या

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर
1

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं
2

Irani Cup 2026: स्मरणचा शतकी धडाका अन् मुकेशचा बॉलिंग हल्लाबोल! रेस्ट ऑफ इंडियाचा दणदणीत विजय; जम्मू-काश्मीरला १६७ धावांनी लोळवलं

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण
3

IND vs WI: सिरीजमध्ये पहिल्यांदाच केली बॅटिंग अन् बनवला रेकॉर्ड, KL Rahul ने 80 चेंडूत झळवले शतक, 10 हजार धावा पूर्ण

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King
4

Cricket: क्रिकेटविश्वात धावांचं महावादळ! ‘या’ फलंदाजाने उद्ध्वस्त केला Chris Gayle चा 175 धावांचा रेकॉर्ड; बनला T20 चा नवा King

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.