Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानात वाघासारखा डरकाळी फोडणारा ‘तो’ गोलंदाज आज ‘लाईफ सपोर्ट’वर! ICU मध्ये सुरू आहे मृत्यूशी झुंज

आपल्या भेदक गतीने एकेकाळी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर झद्रान सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाईचा सामना करत आहे. एका गंभीर वैद्यकीय परिस्थितीमुळे तो त्रस्त आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 19, 2026 | 01:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ३८ वर्षीय झद्रान ICU मध्ये मृत्यूशी झुंज
  • काही चिंताजनक फोटो शेअर
  • अव्वल दर्जाच्या फलंदाजांना बाद
Afghanistan Cricketer Shapoor Zadran hospitalised in India : आपल्या भेदक गतीने एकेकाळी फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर झद्रान सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाईचा सामना करत आहे. एका गंभीर वैद्यकीय परिस्थितीमुळे ३८ वर्षीय झद्रान ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असून, डॉक्टर त्याच्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.

BCCI चा मोठा निर्णय! Ajit Agarkar युग कायम ? BCCIकडून कार्यकाळ वाढवण्याची शक्यता; 2027 वर्ल्ड कपपर्यंत मोठी जबाबदारी

काही चिंताजनक फोटो शेअर

पाकिस्तानचा माजी विकेटकीपर-फलंदाज कामरान अकमलने रुग्णालयातून झाद्रानचे काही चिंताजनक फोटो शेअर केले आहेत. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, झाद्रान हा त्याच्यासाठी एका मित्रासमान आहे आणि तो त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे. हे फोटो सोशल मीडियावरुन समोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वी, पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही झाद्रानच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. आफ्रिदीने सांगितले की, त्याने झाद्रानच्या भावाशी संवाद साधला होता आणि त्याच्याकडूनच त्याला झाद्रानच्या परिस्थितीचे गांभीर्य समजले. झाद्रानच्या कुटुंबीयांनीही सोशल मीडियाद्वारे अपडेट्स शेअर केले, ज्यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट ब्लड सेल (WBC) संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, त्यामुळे त्याच्यासाठी एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. उपचाराचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Zardan brother is like a buddy to me. I am wishing him speedy recovery. Ameen🤲 pic.twitter.com/8oGPUVwHai — Umar Akmal (@Umar96Akmal) April 17, 2026

शपूर जाद्रानची क्रिकेट कारकीर्द

त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, शपूर जाद्रान हा अफगाणिस्तानच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्याने २००९ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या कारकिर्दीदरम्यान, त्याने एकूण ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले; ज्यामध्ये ४४ एकदिवसीय (ODI) आणि ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होता.

अव्वल दर्जाच्या फलंदाजांना बाद

एकदिवसीय सामन्यांमध्ये जाद्रानने ४४ बळी (विकेट्स) मिळवले, ज्यामध्ये २४ धावा देऊन ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने २७ बळी घेतले, ज्यामध्ये ४० धावा देऊन ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. जाद्रानने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि तिलकरत्ने दिलशान यांसारख्या अव्वल दर्जाच्या फलंदाजांना बाद करून त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे.

IPL 2026 : आईपीएलमध्ये आज Rajasthan Royals विरुद्ध Kolkata Knight Riders भिडणार, सूर्यवंशीवर राहणार सर्वांच्या नजरा

Web Title: Shapoor zadran health update icu afghanistan cricketer critical wbc condition see for more details sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Marathi News
  • Medical Report
  • medical treatment
  • Sports News
  • Team Afganistan

संबंधित बातम्या

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव
1

राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गोयनका महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन! मैदान गाजवणाऱ्या विजेत्या खेळाडूंचा गौरव

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
2

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
3

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
4

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.