Shardul Thakur: 'A call from Zaheer Khan and I..'; Shardul Thakur expressed his struggle for entry into the IPL..
Shardul Thakur : गेल्या बुधवारी आयपीएलच्या 18 व्या हंगामातील 7 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा ला पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादने लखनौसमोर एकूण 191 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते लखनौने सहज पूर्ण केले. या विजयात ‘लॉर्ड शार्दुल ठाकूर’ने महत्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा : IPL 2025 : रोहित शर्मा ‘सिक्सर किंग?’ छे, छे…! आता ते विसरा: ‘किंग कोहली’ विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर…
या सामन्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो म्हणजे शार्दुल ठाकूर. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांणना धक्का दिला आणि हैदराबादविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 34 धावा देत 4 गाडी बाद केले. यामध्ये त्याने अभिषेक शर्मा आणि मागील सामन्यात शतक झळकवणाऱ्या इशान किशन या दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळेच हैद्राबादला 190 धावापर्यंत रोखण्यात लखनौला यश आले. या कामगिरीमुळे ठाकूरने आपल्याकडे लिलावात दुर्लक्ष करून फ्रँचायझींनी किती मोठी चूक केली, हे सिद्ध केले.
लिलावात विकला न गेलेलया शार्दूलला लखनऊ सुपरजायंट्स संघात कसा प्रवेश मिळाला? असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर स्वत: ठाकूरने दिले आहे. याबद्दल शार्दुल ठाकूर काय म्हणाला जाणून घेऊया.
शार्दुल ठाकूर म्हणाला की, आयपीएल लिलावाचा दिवस हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता. त्याला एक देखील खरेदीदार सापडला नाही. अशा वाईट परिस्थितीत लखनौ सुपरजायंट्सकडून फोन आला. फोन आला तेव्हा शार्दुलने निर्णय घेण्यास एक मिनिट देखील उशीर केला नाही. शार्दुल पुढे म्हणाला की, ‘आयपीएलमध्ये असे घडत असते. दुर्दैवाने, काही संघातील खेळाडूंना दुखापत झाली आणि खेळाडू जखमी झाले. त्यावेळी एलएसजीने प्रथम माझ्याशी संपर्क साधला म्हणून मी त्यांची ऑफर तात्काळ स्वीकारली. याबाबत ज्याच्यासोबत कॉलवर शार्दुल बोलला तो कोण होता? यावर उत्तर देताना शार्दुल म्हणाला की, त्याला झहीर खानने बोलावले होते.
शार्दुल पुढे म्हणाला की, माझ्यासाठी सामना जिंकणे जास्त महत्त्वाचे असते. मी विकेट किंवा धावांचा तक्ता पाहत नाही. मला फक्त सामना जिंकणारा प्रभाव निर्माण करायचा आहे. तो म्हणाला की एसआरएचचे फलंदाज हे गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढवत असतात. अशा वेळी गोलंदाजांनीही फलंदाजांवर आक्रमण करणे महत्वाचे असते. या संघाविरुद्ध आम्ही हीच योजना आखली होती.
शार्दुल एलएसजीकडून दोन्ही सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, त्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. संघमालकांनी लिलावात त्याच्याकडे कसे दुर्लक्ष केले, याबद्दल लोक संतापलेले दिसत आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा हा दुसरा सामना यामध्ये त्यांनी एसआरएचचा पराभव केला. यापूर्वी या संघाला दिल्लीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.