शेफाली वर्माचे शानदार अर्धशतक (फोटो- ट्विटर)
बांग्लादेशच्या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारतीय महिला संघ खेळण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने डावाची सुरुवात केली आहे. मात्र स्मृती मंधाना केवळ 2 रन्सची खेळी करून आउट झाली. त्यानंतर प्रतिका रावलने देखील 20 रन्सची खेळी केली. मात्र भारताची सलामीची खेळाडू शेफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. ती 64 रन्सची खेळी करून आउट झाली. रिचा घोष अत्यंत महत्वाच्या 21 रन्स करून आउट झाली. दीप्ती शर्मा 13 रन्स करून आउट झाली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने संयमी खेळी केली.
Ind vs Afg: कुठे पाहता येणार भारत विरुद्ध अफगणिस्तान टी-20 सिरीज? 13 सप्टेंबरपासून रंगणार थरार
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. बांग्लादेश महिला संघाने चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सुलताना खातूनने भारतीय संघाला दोन मोठे धक्के दिले. सुलताना खातूनने स्मृती मंधाना आणि अर्धशतकी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला आउट केले. राबिया खानने देखील एक विकेट पटकावली. तिने प्रतिका रावलला आउट केले.
6️⃣4️⃣ Runs
4️⃣0️⃣ Balls
1️⃣6️⃣0️⃣ Strike Rate
3️⃣ Sixes & 7️⃣ Fours A superb show in the semi-final from @TheShafaliVerma 👏 Updates ▶️ https://t.co/6OyMx9q1ih#TeamIndia | #WomensAsiaCup | #INDvBAN pic.twitter.com/K0Dhq3MkMr — BCCI Women (@BCCIWomen) September 10, 2026
भारतीय महिला संघ: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चराणी, क्रांती गौड, नंदिनी शर्मा.
Smriti Mandhana: स्मृती मंधानाच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड, केवळ 69 धावा दूर
बांग्लादेश महिला संघ: दिलारा अख्तर, जुएरिया फिरदौस, शोभाना मोस्तारी, निगार सुलताना (कर्णधार व यष्टिरक्षक), शर्मिन अख्तर, शोर्णा अख्तर, फहिमा खातून, नाहिदा अक्तेर, राबेया खान, सुलताना खातून, मारुफा अख्तर.






