फोटो सौजन्य सोशल मिडिया
तालुक्यातील केहऱ्हाळा येथे कल्याण मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून अड्डा चालवणाऱ्या सुभाष पांढरे (55, रा. केन्हाळा) या इसमास रंगेहाथ पकडून बुधवारी 21 ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल केला आहे.
केहऱ्हाळा येथे विनापरवाना बेकायदा कल्याण मटका नावाचा जुगार खेळ खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे, पो.हे.का. सिताराम नरके यांनी बोरगाव बाजार येथे छापा टाकत सुभाष पांढरेला अटक केली, तर विनापरवाना देशी दारूची वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने ती बाळगल्याप्रकरणी किशोर पांडू भिसे (40, रा. बोरगाव बाजार) याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
किशोर भिसे याच्याकडे संजीवनी संत्रा ब्रँडच्या देशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. प्रत्येकी 100 रुपये किमतीप्रमाणे या दारूची एकूण किंमत 1 हजार 300 रुपये आहे. विनापरवाना दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा बाळगल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस हवालदार विनोद सरवदे यांनी तक्रार दिली. पुढील तपास सहायक फौजदार अक्रम पठाण करीत आहेत.
Ans: कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला, तर बोरगाव बाजार येथे विनापरवाना देशी दारू बाळगल्याप्रकरणी कारवाई
Ans: सुभाष पांढरे (वय ५५, रा. केहऱ्हाळा) याला पकडण्यात आले.
Ans: १ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






