दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजची पत्नी नक्की कोण आहे? भारताशी काय आहे संबंध?
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेट केशव महाराज यांची पत्नी लेरिशा महाराज तिच्या आकर्षक लूक आणि ग्लॅमरस जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. दक्षिण आफ्रिकन आणि भारतीय वंशाच्या लेरिशाने प्रसिद्ध फिरकी गोलंदाजाची पत्नी म्हणूनच नव्हे तर स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. स्वतः एक स्टाइल आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
लेरिशा मुनुस्वामी तज्ज्ञ वकील आहे. एक कुशल कथक नृत्यांगना देखील आहे. शास्त्रीय भारतीय कला प्रकाराबद्दल आवड असलेली लेरीशा वारंवार तिच्या नृत्य सादरीकरणाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. केशव महाराजशी तिची भेट एका मित्राकडून झाली. त्यानंतर काही वर्षे ते डेटींग करत होते. त्यांनंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. आणि एप्रिल २०२२ मध्ये त्यांचं लग्न झालं. विशेष म्हणजे, केशवप्रमाणेच, लेरिशाच्या कुटुंबाचं मूळ देखील उत्तर प्रदेशमध्ये आहे. दक्षिण आफ्रीकेत असूनही तिने भारतीय परंपरा आणि संस्कृती जपली आहे. लेरिशा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे आणि तिच्या दैनंदिन जीवनातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
केशव महाराज आणि लेरीशाचं २०२० मध्ये लग्न होणार होतं. मात्र कोविड-१९ महामारीमुळे दोन वर्षांसाठी पुढे ढकलावं लागलं. अखेर २०२२ मध्ये डर्बनमध्ये भारतीय पारंपरिक विधींनुसार दोघांच थाटात लग्न समारंभ पार पडला. २०२४ मध्ये, लेरिशा आणि केशव महाराज यांना मुलगी झाली आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आणखी एक सुंदर अध्याय जोडला गेला.