Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

AUS vs SA: तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा २ विकेट्सने पराभव केला आणि मालिका २-१ अशी जिंकण्यातही यश मिळवले. या सामन्याचा विजय ठरला ग्लेन मॅक्सवेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 16, 2025 | 08:38 PM
Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
Follow Us
Close
Follow Us:
  • Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ
  • थरारक विजयासह मालिका नावावर
  • दिग्गजांच्या यादीतही स्थान!
AUS vs SA 3rd T20I: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यातील तीन टी२० सामन्यांची मालिका आता ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली आहे. केर्न्समध्ये झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने विजय मिळवत मालिका नावावर केली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र १२२ धावांत ६ विकेट्स गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ संकटात सापडला होता. अशा कठीण परिस्थितीत, ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) मैदानात आला आणि त्यांनी एक बाजू सांभाळत संघाला विजयाच्या दिशेने नेले. मॅक्सवेलने ३६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने १९.५ ओव्हर्समध्ये विजय मिळवला.
GLENN MAXWELL WINS IT ON THE SECOND LAST BALL!#AUSvSA pic.twitter.com/gvrzvyHnGc — cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2025

दिग्गजांच्या यादीत मॅक्सवेल

गेल्या काही काळापासून आपल्या खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करत असलेल्या मॅक्सवेलने या सामन्यात पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले. ६२ धावांच्या या दमदार खेळीसह, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजयी ठरलेल्या सामन्यांत २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. या यादीत त्याच्या आधी डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याच्या नावावर २२३७ धावा आहेत. मॅक्सवेल सध्या जागतिक यादीत १०व्या क्रमांकावर आहे.

SA vs AUS : डेवाल्ड ब्रेव्हिसचा धुमाकूळ सुरूच; रचला आणखी एक इतिहास; ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करणारा तो पहिलाच….

प्लेअर ऑफ द मॅचमध्ये वॉर्नरची बरोबरी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातील मॅच-विनिंग कामगिरीमुळे मॅक्सवेलला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब मिळाला. हा त्याचा टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १२वा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार होता. यासह, तो ऑस्ट्रेलियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत डेव्हिड वॉर्नरच्या बरोबरीने पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणारे खेळाडू:

डेव्हिड वॉर्नर – १२

ग्लेन मॅक्सवेल – १२

शेन वॉटसन – ९

अ‍ॅडम झम्पा – ८

अ‍ॅरॉन फिंच – ८

ऑस्ट्रेलियाला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या प्रशिक्षक Bob Simpson यांचे वयाच्या 89 व्या वर्षी झाले निधन

कसा राहिला सामना

तिसऱ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकत गोलंदाजीता निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट गमावून कांगारुसमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने ५३ धावांची खेळी केली. त्यानंतर, कर्णधार मिशेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करताना झटपट सुरुवात केली. त्याने ३७ चेंडूत ५४ धावा केल्या आणि संघाला ६६ धावांची सलामी दिली. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचे चार बळी घेतले आणि धावसंख्या ८८/४ झाली. येथून सामना पूर्णपणे रोमांचक वळणावर पोहोचला.

मॅक्सवेलची स्फोटक फलंदाजी

दरम्यान, ग्लेन मॅक्सवेलने येताच सामन्याचे चित्र उलगडले. त्याने खालच्या फळीसोबत भागीदारी करताना स्फोटक फलंदाजी केली आणि २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने शेवटच्या षटकात १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. मॅक्सवेलने शानदार रिव्हर्स शॉटसह विजयी धावा काढल्या आणि नाबाद ६२* धावा (३६ चेंडू) करत संघाला २ विकेटने विजय मिळवून दिला.

Web Title: South africas bowlers are helpless against glenn maxwells storm series title with thrilling win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • cricket
  • cricket news
  • Glenn Maxwell
  • Sports

संबंधित बातम्या

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर
1

Ashes Series : नवीन वर्षाच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, या ऑफस्पिनरचा समावेश! वाचा सविस्तर

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी  कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन
2

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी कसा असेल भारतीय संघ? आकाश चोप्राने केला दावा; या गोलंदाजाचे होणार पुनरागमन

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर
3

पाकिस्तानच्या माजी प्रशिक्षकाने उघडले PCB चे काळे सत्य! पद सोडण्याचे खरे कारण केले उघड, वाचा सविस्तर

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल
4

पाकिस्तानात जन्मलेल्या या ऑस्ट्रेलियन खेळाडूचा संस्मरणीय प्रवासाचा होणार शेवट…पत्रकार परिषदेमध्ये झाला इमोशनल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.