डेवाल्ड ब्रेव्हिस(फोटो-सोशल मीडिया)
Dewald Brevis’ fastest fifty against Australia : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील शेवटच्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात, दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने फलंदाजीमध्ये सातत्य राखत मोठी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा पराक्रम करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच फलंदाज बनला आहे. ब्रेव्हिसने २२ चेंडूत अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे.
केर्न्समध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात, दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेची सुरवात खराब झाली होती.संघ वाईट स्थितीत असताना डेवाल्ड ब्रेव्हिसने क्रीजवर येऊन स्फोटक खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम देखील केला. ब्रेव्हिसने २६ चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी केली. यासह, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद टी-२० अर्धशतक झळकावणारा फलंदाज देखील बनला आहे.
हेही वाचा : जय शाहपासून ते अनिल कुंबळेपर्यंत, क्रिकेटपटूंकडून श्रीकृष्णजन्माष्टमीच्या खास शुभेच्छा; वाचा सविस्तर..
दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेव्हिसने २२ चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ६ षटकार आणि १ चौकार मारला आहे. त्याच वेळी, ब्रेव्हिसने गेल्या सामन्यात २५ चेंडूत आपले अर्धशतक लागवले. त्याआधी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या जेपी ड्युमिनीच्या नावावर जमा होता. ड्युमिनीने ३१ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली होती.
या अर्धशतकासह, डेवॉल्ड ब्रेव्हिसने आणखी एका मोठ्या कामगिरीला गवसणी घातली आहे. ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले आहे. या प्रकरणात, ब्रेव्हिसने आता इंग्लंडच्या रवी बोपाराला पिछाडीवर टाकले आहे. रवी बोपाराने २०१४ मध्ये होबार्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक झळकावलत ही कामगिरी केली होती. तर ब्रेव्हिसने हा विक्रम मोडत २२ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे.
हेही वाचा : नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी गमावत १७२ धावा उभ्या केल्या. तथापि, दक्षिण आफ्रिकेचा संघ एका वेळी २०० धावांचा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते. परंतु डेवॉल्ड ब्रेव्हिसची विकेट गेल्यानंतर फलंदाजांना फारसे काही योगदान देता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने ५३, रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने ३८, ट्रिस्टन स्टब्सने २५, लुआन ड्रे प्रिटोरियसने २४ आणि रायन रिकेल्टनने १३ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने २, अॅडम जम्पाने २ आणि नॅथन एलिसने ३ बळी टिपले.