‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’
‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
आर्यन्स् ॲकॅडमी, फॅन्टम क्लबची विजयी कामगिरी
फॅन्टम क्रिकेट क्लबने २५ षटकात १३१ धावांचे लक्ष्य केले उभे
पुणे: स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पाचव्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स् क्रिकेट ॲकॅडमी आणि फॅन्टम क्रिकेट क्लब या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली. सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत तनिष्क जाधव याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर फॅन्टम क्रिकेट क्लबने क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा ५८ धावांनी पराभव करून पहिला विजय नोंदविला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना फॅन्टम क्रिकेट क्लबने २५ षटकात १३१ धावांचे लक्ष्य उभे कले. ओंकार भंडारी याने ३५ धावांची खेळी केली. रोहन यादव आणि ओजस वाईकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या लक्ष्याचा पाठलाग करताना क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमीचा डाव ७३ धावांवर संपुष्टात आला. तनिष्क जाधव याने ११ धावांत ३ गडी बाद केले. हेयान चौधरी आणि नकुल राठोड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.
डीएलएस पध्दतीनुसार आर्यन्स विजयी
पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात अरिहंत शेळके याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आर्यन्स् ॲकॅडमीने विराग ॲकॅडमीचा सात धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना विराग क्रिकेट ॲकॅडमीचा डाव ६३ धावांवर संपुष्टात आला. यश वीर याने २५ धावा करून एकहाती लढा दिला. अरिहंत शेळके याने १४ धावांत तीन तर, मनु शर्मा याने दोन गडी बाद केले. आर्यन्स् क्रिकेट ॲकॅडमीने ६.२ षटकात १ गडी गमावून २३ धावा जमविल्या होत्या. त्यावेळी पावसामुळे सामना थांबविण्यात आला. डीएलएस पध्दतीनुसार आर्यन्स संघाला १७ धावा जमविणे आवश्यक होते. डीएलएस पध्दतीने त्यांची धावसंख्या जास्त असल्याने पंचांनी आर्यन्स्ला विजयी घोषित केले.
पुण्याचा १९ वर्षीय सार्थक चव्हाण ठरला नॅशनल चॅम्पियन! मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर ऐतिहासिक विजेतेपद!
सामन्यांचा संक्षिप्त निकाल : गटसाखळी फेरी :
फॅन्टम क्रिकेट क्लब : २५ षटकात ८ गडी बाद १३१ धावा (ओंकार भंडारी ३५, असद पठाण नाबाद १३, रोहन यादव २-१८, ओजस वाईकर २-२८) वि. वि. क्रिकेट नेक्स्ट ॲकॅडमी : १९ षटकात ९ गडी बाद ७३ धावा (अव्देत अमोंडकर २४, तनिष्क जाधव ३-११, हेयान चौधरी २-१, नकुल राठोड २-९); सामनावीर : तनिष्क जाधव
विराग क्रिकेट ॲकॅडमी : २२.३ षटकात ९ गडी बाद ६३ धावा (यश वीर २५, अरिहंत शेळके ३-१४, मनु शर्मा २-९) डीएलएस पध्दतीनुसार पराभूत वि. आर्यन्स् क्रिकेट ॲकॅडमी : ६.२ षटकात १ गडी बाद २३ धावा (अरहाम कोठारी नाबाद ६, समर्थ कदम ३, श्लोक सागरे १-४); सामनावीर : अरिहंत शेळके.






