इशान किशनची जोरदार खेळी (फोटो- ट्विटर)
सनरायजर्स हैदराबादच्या ओपनर्सची निराशाजनक फलंदाजी
कर्णधार इशान किशनने केली अर्धशतकी खेळी
12 ओव्हर्समध्ये हैद्राबाचे धावांचे शतक झाले पूर्ण
Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात (IPL 2026) सामना सुरू आहे. आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. आरसीबीने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या संघाने फलंदाजी करतानाया पॉवर प्ले मध्ये आपल्या तीन विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर कर्णधार ईशान किशनने संघाचा डाव सांभाळला. इशान किशनने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला.
𝙍𝙞𝙨𝙞𝙣𝙜 to the 𝘾𝙝𝙖𝙡𝙡𝙚𝙣𝙜𝙚 🫡 A phenomenal FIFTY on #TATAIPL captaincy debut for #SRH skipper @ishankishan51 🧡 Updates ▶️ https://t.co/Eo5z0jh4K4 #KhelBindaas | #RCBvSRH | @SunRisers pic.twitter.com/HbkY2NOQlF — IndianPremierLeague (@IPL) March 28, 2026
इशान किशनने 34 चेंडूत 72 धावा केल्या. इशान किशन अजूनही खेळत असून, आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न तो करत आहे. इशान किशन आणि हेनरी क्लासेन यांनी हैद्राबादचा डाव सावरला. हेनरी क्लासेन 31 धावा करून बाद झाला. तर हैद्राबादच्या ओपनर्सने निराशा केली. नितीश कुमार रेड्डी केवळ 1 धाव करून बाद झाला. तर ट्रेविस हेड 11 धावांवर कॅच आउट झाला. तर अभिषेक शर्माने देखील निराशा केली. तो केवळ 7 धावा करून बाद झाला. मात्र सध्या हैद्राबादचा संघ 15 ओव्हर्समध्ये 141 धावांवर पोहोचला आहे.
Tata IPL 2026 RCB Vs SRH Live: बंगलोरमध्ये येणार हेड-शर्माचे वादळ; RCB करणार प्रथम गोलंदाजी
9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार
तब्बल 9 वर्षांची या आयपीएलची सुरुवात बंगलोर विरुद्ध हैदराबाद अशी होणार आहे. 2017 मध्ये आयपीएलची सुरुवात हैदराबाद विरुद्ध बंगलोर अशी झाली होती. 2017 मध्ये हैदराबादच्या संघाने बंगलोरला फायनलमध्ये हरवले होते. तर यंदा बंगलोरचा संघ गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. 9 वर्षांमध्ये दोन्ही संघात अनेक बदल झाले आहेत. काही खेळाडू देखील बदलले गेले आहेत. 2017 मध्ये वेळेस बंगलोरच्या संघात ट्रेविस हेड देखील सामील होता. तर भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या संघात सामील झाला होता.
IPL 2026: राडा निश्चित! 9 वर्षांनंतर RCB विरुद्ध SRH भिडणार; ‘या’ जबरदस्त खेळाडूंची अदलाबदली
एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास, हर्ष दुबे, इशान मलिंगा
आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार






