फोटो सौजन्य - Lucknow Super Giants सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये धमाकेदार सुरुवात करून राजस्थान रॉयल्स धूळ चारली होती, तर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा करावा लागला होता त्यामुळे रिषभ पंतचा संघ या आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये पहिल्या विजयाच्या शोधात आहे. परंतु हे तितके सोपे असणार नाही कारण एलएसजी गोलंदाजांना सनरायझर्सच्या चमकदार फलंदाजीवर मात करणे सोपे जाणार नाही. आजचा सामना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळवला जाणार आहे.
IPL 2025 : मोठी अपडेट! लेकीच्या जन्मानंतर KL Rahul दिल्ली कॅपिटल्ससाठी दुसरा सामना खेळणार का?
सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला होता, त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे, आजच्या सामन्यांमध्ये एलएसजीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल दिसून येतो. लखनौ सुपर जायंट्सने त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत खेळला, या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीविरुद्ध एलएसजीच्या गोलंदाजांना वाईट फटका बसला. अशा परिस्थितीत आता कर्णधार ऋषभ पंत गोलंदाजी संघात बदल करू शकतो. शेवटच्या सामन्यात, वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव एलएसजीकडून खेळताना दिसला आणि हा प्रिन्सचा पहिला आयपीएल सामना होता.
KKR vs RR : राजस्थानचे फलंदाज आणखी एकदा फेल, कोलकाता नाईट राइडर्ससमोर 152 धावांचे लक्ष्य
या सामन्यात प्रिन्स यादव गोलंदाजीत फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याने ४ षटकांत ४७ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. अशा परिस्थितीत, या खेळाडूला दुसऱ्या सामन्याच्या अंतिम अकरामधून वगळले जाऊ शकते. आवेश खान हा एलएसजीच्या मॅन विनर खेळाडूंपैकी एक आहे, जरी त्याला पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. आता अशी अपेक्षा आहे की सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रिन्स यादवच्या जागी आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. आवेश खानने आतापर्यंत ६२ आयपीएल सामन्यांमध्ये ७४ विकेट्स घेतल्या आहेत.
AVESH KHAN IS BACK…!!! 🚨🚨
He is expected to be available for selection for their next match, against Sunrisers Hyderabad [ESPN]pic.twitter.com/5wInzwJeBR
— Rishabhians (@Rishabhians17) March 26, 2025
आजच्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेइंग ११ मध्ये कशाप्रकारे बदल होईल हे तर नाणेफेक झाल्यावरच समजणार आहे त्याआधी एलएसजीचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते यावर एकदा नजर टाका.
एडेन मार्कराम, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार-विकेटकिपर), निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, दिग्वेश राठी, आवेश खान आणि एम सिद्धार्थ.