Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH जिंकली पण RCB सरस! पराभवातही बंगळुरूचा ‘टॉप गेम’; पाहा कसं बदललं समीकरण

RCB Qualified For Top -2: आरसीबीविरुद्ध सामना जिंकूनही सनरायझर्स हैदराबादला गुणतालिकेत कोणताही फायदा झाला नाही. सध्या ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून त्यांची टॉप-२ मध्ये जाण्याची संधी हुकली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 23, 2026 | 02:46 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Close
Follow Us:
  • SRH चा दणदणीत विजय
  • प्लेऑफ समीकरणात फायदा बंगळुरुला
  • हैदराबादसमोर आरसीबीचा फ्लॉप बॅटिंग शो
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा ६७ वा लीग स्टेज सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. यजमान संघ सनरायझर्स हैदराबादने हा सामना ५५ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० ओव्हरमध्ये २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बंगळुरू फक्त २०० धावा करु शकला. मात्र, सामना जिंकूनही हैदराबादला क्वालिफायर १ खेळता येणार नाही. आरसीबी, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांनी आपले लीग स्टेजमधील १४ सामने खेळले आहेत. त्यांचे प्रत्येकी १८ गुण आहेत.

IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral

हैदराबादचा विजय पण आरसीबीने मारली बाजी

आयपीएललमध्ये सर्वात मजबूत स्थितीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पराभवा पत्कारावा लागला. परंतु, या पराभवानंतरही आरसीबीचे कोणतेही नुकसान झाले नाही, चांगल्या नेट रन रेटमुळे ते गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम राहिले. यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. २६ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. दुसरीकडे, हैदराबादला या विजयाचा फायदा झाला नाही. हैदराबाद गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत. यामुळे ते एलिमिनिटेर सामना खेळतील.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचे वर्चस्व

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी चार ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या, पण रसिक सलाम दारने हेडला २६ धावांवर बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्माने इशान किशनसोबत मिळून फटकेबाजी केली. अभिषेकने अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले आणि २२ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. इशान किशननेही हेनरिक क्लासेनसोबत एक धडाकेबाज फलंदाजीची भागीदारी केली. क्लासेनने २४ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या, तर इशान किशनने ७९ धावा केल्या. नितीश रेड्डीनेही पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत १२ चेंडूंमध्ये नाबाद २९ धावा केल्या.

हैदराबादसमोर आरसीबीचा फ्लॉप बॅटिंग शो

आरसीबीची मजबूत फलंदाजी हैदराबादविरुद्ध अपयशी ठरली. व्यंकटेश अय्यरने १९ चेंडूंमध्ये ४४ धावा करून वेगवान सुरुवात केली, पण तो ईशान मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शकिब हुसेनने विराट कोहलीला १५ धावांवर बाद करून आरसीबीला मोठा धक्का दिला. देवदत्त पडिक्कल १४ चेंडूंमध्ये केवळ २१ धावाच करू शकला. रजत पाटीदारने ५६ धावा केल्या, पण त्याची खेळी खूपच संथ होती. कृणाल पांड्याने नाबाद ४१ आणि टिम डेव्हिडने नाबाद १५ धावा केल्या. अखेरीस, आरसीबी केवळ २०० धावाच करू शकली आणि ५५ धावांनी सामना हरली.

पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी अव्वल

बंगळुरुने १४ पैकी ९ सामने जिंकून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. गुजरात टायटन्सनेही १४ पैकी नऊ सामने जिंकले. हैदराबादनेही १४ पैकी नऊ सामने जिंकले, पण त्यांचा नेट रन रेट आरसीबी आणि गुजरातपेक्षा कमी आहे. आता, राजस्थानला चौथे स्थान मिळवण्याची उत्तम संधी आहे. राजस्थानचा सामना मुंबईशी होणार असून, त्या सामन्यातील विजयामुळे त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पराभव झाल्यास केकेआर किंवा पंजाबला क्वालिफाय होण्याची संधी मिळेल.

IPL 2026: नशिबाचा खेळ की कष्टाचं फळ? 4 संघ अन् जागा 1; प्लेऑफसाठी ‘कांटे की टक्कर’

Web Title: Srh vs rcb ipl 2026 hyderabad beat bangalore by 55 runs but rcb benefited points table update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Royal Challengers Bengaluru
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral
1

IPL 2026: मैदानावर विराट-हेड आमनेसामने! बाचाबाचीने तापलं वातावरण; ‘हँडशेक’ नाकारल्याचा Video Viral

IPL 2026 Points Table : 15 वर्षांनंतर RCBचा दबदबा! गुणतालिकेत अव्वल स्थान; IPL इतिहासात किती वेळा ठरली No.1?
2

IPL 2026 Points Table : 15 वर्षांनंतर RCBचा दबदबा! गुणतालिकेत अव्वल स्थान; IPL इतिहासात किती वेळा ठरली No.1?

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर
3

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट
4

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.