
राजस्थान रॉयल्स अन् सनरायझर्स हैदराबादमध्ये होणार एलिमिनेटर
ट्रेविस हेड अन् जोफ्रा आर्चरच्या कामगिरीकडे लक्ष
उद्या चंदीगडच्या स्टेडियम होणार महामुकाबला
IPL 2026 SRH Vs RR Eliminator 2026 Updates: सध्या आयपीएल 2026 च्या हंगामातील प्ले ऑफचे सामने सुरू आहेत. आज सर्वात महत्वाचा सामना या स्पर्धेतील होणार आहे. टॉप 4 मधील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेले (IPL 2026) सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. उद्याचा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.
उद्या राजस्थान रॉयल्स आणि एसआरएचमध्ये आज अत्यंत महत्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ पराभूत होईल, तो संघ आज या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. तसेच जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर 1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. मात्र आज आपण असे खेळाडू जाणून घेणार आहोत, ते एसआरएचसाठी धोकादायक ठरू शकतात.
वैभव सूर्यवंशी: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. वैभवने यंदाच्या हंगामात मोठी आक्रमक खेळी आणि जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 14 सामन्यात 550 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने एसआरएचच्या गोलंदाजांची तो धुलाई करू शकतो.
IPL 2026: प्लेऑफचा थरार वाढला; ऑरेंज-पर्पल कॅपची चुरस शिगेला, खेळांडूमध्ये कांटे की टक्कर
जोफ्रा आर्चर: जोफ्रा आर्चर हा राजस्थान रॉयल्सचा एक प्रमुख गोलंदाज आहे. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजीची मदार त्याच्या खांद्यावर असणार आहे. आतापर्यंत हंगामात त्याने चांगली अचूक गोलंदाजी केली आहे. त्याने राजस्थानला अनेक महत्वाच्या सामन्यात विजय देखील मिळवून दिला आहे.
यशस्वी जयस्वाल: यशस्वी जयस्वाल याने राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व देखील केले आहे. त्याने आपल्या भेदक फलंदाजीने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वीची सलामीची जोडी राजस्थानसाठी महत्वाची असणार आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील फलंदाजांवर राजस्थान रॉयल्सची ताकद असणार आहे.
प्लेऑफमध्ये दोनदा आमनेसामने
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल प्लेऑफमध्येही सामना झाला आहे. २०२४ हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना या दोन संघांमध्ये खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला. त्यापूर्वी, २०१३ मध्ये हे दोन संघ एका एलिमिनेटर सामन्यातही खेळले होते. त्या सामन्यात राजस्थानने हैदराबादला ४ गडी राखून पराभूत केले होते.
या हंगामातील राजस्थान आणि हैदराबादची कामगिरी
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ ची सुरुवात जोरदार केली आणि आपले पहिले चार सामने जिंकले. त्यानंतर, त्यांना सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. ५ व्या ते १२ व्या सामन्यांदरम्यान संघाला केवळ दोन विजय मिळवता आले. तथापि, शेवटचे दोन सामने जिंकून त्यांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला आपल्या पहिल्या चार सामन्यांमध्ये तीन पराभव पत्करावे लागले. त्यानंतर, राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी सलग ५ विजयांची मालिका सुरू केली. तेव्हापासून, संघाने १० पैकी ८ सामने जिंकले आहेत.