Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonal Dinusha: गरिबी, संघर्ष आणि बहिणीचा मोठा त्याग, कोण आहे सोनल दिनुशा; भारतीय टीमला रडवलं

Sonal Dinusha: श्रीलंकेने भारताविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी, २५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सोनल दिनुशाने सर्वांची मने जिंकली. या मालिकेत तो एकमेव खेळाडू ठरला ज्याने भारतीयांच्या नाकी नऊ आणले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 28, 2026 | 07:10 PM
सोनल दिनुशाची संघर्षकथा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सोनल दिनुशाची संघर्षकथा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात सोनल दिनुशाची तुफान कामगिरी 
  • गरिबी आणि संघर्षातून कसा मिळवला सोनल दिनुशाने विजय 
  • सोनल दिनुशाची प्रेरणात्मक कथा 
Sonal Dinusha: कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लबमध्ये भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या आक्रमक फलंदाजीने एकहाती सामना अनिर्णित राखणारा २५ वर्षीय श्रीलंकन ​​अष्टपैलू खेळाडू सोनल दिनुशा क्रिकेट विश्वात एक खळबळ बनला आहे. भारतीय संघाकडून एकहाती विजय हिसकावून घेणाऱ्या या खेळाडूसाठी, क्रिकेट हा केवळ एक खेळ नव्हता, तर आपल्या कुटुंबाला गरिबी आणि दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग होता. 

भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दिनुशाने तीन शतकांसह १४० च्या सरासरीने ४२० धावा केल्या. केवळ पाचवी कसोटी खेळणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाच्या यशामागे त्याच्या बहिणीचा खडतर संघर्ष आणि अथांग त्याग दडलेला आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोनल दिनुशाचा हा संघर्ष जाणून घेऊया. 

पहिल्या बॅटसाठी बहिणीने उधार घेतले पैसे 

सोनल दिनुशाचे बालपणीचे प्रशिक्षक, आशान प्रियंजन यांनी अलीकडेच PTI ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, दिनुशाला सुरुवातीला बास्केटबॉलमध्ये खूप रस होता. जेव्हा शाळेचे प्रशिक्षक सुसंथा फेलिक्स डायस यांनी त्याला खेळताना पाहिले, तेव्हा त्यांनी त्याला क्रिकेट संघात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे ना बॅट होती ना किट, आणि त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते.

दिनुशाला त्याची पहिली क्रिकेट बॅट विकत घेण्यासाठी त्याच्या मोठ्या बहिणीने इतरांकडून पैसे उधार घेतले. आज दिनुशा त्याच्या आई-वडिलांच्या आणि भावंडांच्या खूप जवळ आहे, आणि त्याच्या क्रिकेटमधून मिळणारी कमाई हाच त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार आहे.

IND Vs SL: दीनुशाची ‘शतकी’ झुंज व्यर्थ! ‘या’ भारतीय स्टारने मिळवला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा किताब

मालिका संपल्यानंतर मोठे पाऊल उचलले

कॉलेजच्या दिवसांपासून दिनुशा मोठ्या खेळी खेळण्यासाठी आणि खालच्या फळीतील फलंदाजांना सांभाळून सामने जिंकण्यासाठी ओळखला जातो. त्याने कोलंबोमध्ये नुवान्था, जयसूर्या आणि कुमारा यांच्यासोबत हीच कामगिरी पुन्हा केली. भारताविरुद्धची मालिका संपताच प्रशिक्षक प्रियंजन यांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, पण दिनुशाने लगेचच नेटमध्ये परतण्याचा आग्रह धरला, कारण ३१ ऑगस्टला त्याच्या क्लबसाठी मेजर लीगचा ५० षटकांचा सामना आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक टी२० स्पर्धा होती.

स्वीप शॉटने विश्वविक्रम प्रस्थापित केला

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीला, दिनुशाने आपल्या प्रशिक्षकाला फोन करून सांगितले की भारताकडे एक जबरदस्त फिरकी गोलंदाजीचे आक्रमण आहे, त्यामुळे त्याला विशेष तयारी करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी, त्याने कोलंबो क्रिकेट क्लबमध्ये तासनतास फक्त रिव्हर्स स्वीपचा सराव केला.

या तयारीचे परिणाम मैदानावर स्पष्टपणे दिसून आले, जिथे त्याने रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार आणि सारांश जैन यांसारख्या फिरकी गोलंदाजांना निर्भयपणे सामना केला आणि स्वीप शॉट्स मारले. त्याने आपल्या ४२० धावांपैकी १७३ धावा केवळ स्वीप शॉटचा वापर करून केल्या आणि कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाजीविरुद्ध स्वीप शॉटने सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…

Web Title: Sri lankan cricketer sonal dinusha inspirational story won heart against india match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs SL
  • India vs Sri Lanka

संबंधित बातम्या

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक
1

Mohammed Shami: ‘अल्लाह मालिक है…’, क्रिकेट संघात परतण्यावर मोहम्मद शमीचे विधान व्हायरल, अजूनही सकारात्मक

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम
2

Virendra Sehwag Birthday: गोलंदाजांची झोप उडवणारा स्फोटक फलंदाज! सेहवागच्या नावावर अनोखा विश्वविक्रम

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास
3

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास
4

Shafali Verma: स्त्री शक्ती! सर्वाधिक धावा आणि अर्धशतक, शेफाली वर्माने तोडले वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृतीसह रचला इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.