Strong Performance by Indian Players in US Open and Rohan Bopanna and Bhambri Reach Third Round with Their Partners
न्यूयॉर्क : भारताचा युकी भांब्री आणि फ्रान्सचा अल्बानो ऑलिवेट्टी यांनी शानदार पुनरागमन करताना पहिला सेट गमावून ऑस्टिन क्रॅजिसेक आणि जीन-ज्युलियन रॉजर यांचा पराभव करीत यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीची तिसरी फेरी गाठली. भांबरी आणि ऑलिवेट्टी या जोडीने अमेरिकेच्या क्राजिसेक आणि नेदरलँडच्या जीन-ज्युलियन रॉजर या १५व्या मानांकित जोडीचा ४-६, ६-३, ७-५ असा पराभव केला. भांबरीने ग्रँड स्लॅम स्पर्धेची तिसरी फेरी गाठण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. याआधी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही तो असाच टप्पा गाठला होता.
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीनेही केली कमाल
रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या द्वितीय मानांकित जोडीनेही स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना आणि अर्जेंटिनाच्या फेडेरिको कोरिया यांच्यावर 6-2, 6-4 असा विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. दुसरा भारतीय खेळाडू, एन श्रीराम बालाजी आणि त्याचा अर्जेंटिनाचा साथीदार गुइडो आंद्रेओझी दुसऱ्या फेरीत न्यूझीलंडचा मायकेल व्हीनस आणि ग्रेट ब्रिटनचा नील स्कुप्स्की यांच्याकडून पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला. भारत आणि अर्जेंटिनाच्या जोडीला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात 6-7 (4), 4-6 असा पराभव पत्करावा लागला. व्हीनस आणि स्कुप्स्की यांनी सात ब्रेक पॉइंट्सचा सामना केला आणि त्यापैकी एकाचे रुपांतर केले. सव्र्हिस ब्रेकच्या एकमेव संधीचे रुपांतर बालाजी आणि अँड्रॉझी यांना करता आले नाही.
कार्लोस अल्काराझ आणि नोव्हाक जोकोविचही बाद
पुरुष एकेरीत स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराज बाहेर पडल्यानंतर गतविजेता नोव्हाक जोकोविचही यूएस ओपनमधून बाहेर झाला आहे. त्याचा ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरिनने ६-४, ६-४, २-६, ६-४ असा पराभव केला. सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, ‘खरं सांगायचं तर ही माझी आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे. हा सामना माझ्यासाठी दुःस्वप्नसारखा होता. मी माझ्या सर्वोत्तम खेळाच्या जवळपासही खेळू शकलो नाही.