Suryakumar Yadav: Mr. 360 bought two luxurious flats in Mumbai; You will be shocked to read the price..
Suryakumar Yadav : आयपीएल 2025 अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत.पहिला सामाना केकेआर आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारली. आयपीएलने खेळाडूंना नवीन ओळख नरीमन करून दिली आहे. याच माध्यमातून अनेक खेळाडू हे राष्ट्रीय संघात अढळ स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यातलाच एक म्हणजे मिस्टर 360 नावाने ओळखला जाणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव. क्रिकेटर त्यांच्या आलीशान जगण्यासाठी ओळखले जातात. अशातच सूर्यकुमार यादवने मुंबई शहरात दोन आलिशान फ्लॅट विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्या फ्लॅटची किंमत वाचून धडकी भरेल.
क्रिकेटर सूर्यकुमार यादव भारतीय फलंदाजीचा कणा मानला जातो. तो टी20 संघाचा कर्णधार देखील आहे. गेल्या वर्षी टी 20 विश्वचषक जिंकून देण्यात मोठी भूमिका वठवली होती. सूर्यकुमार यादव सध्या आयपीएल 2025 चा 18 वा हंगाम खेळत आहे. तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 18 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंगविरुद्ध सूर्यकुमार यादवने हार्दिक पंड्याच्या जागी मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते. परंतु, हा सामना मुंबई इंडियन्सला जिंकता आला नाही. या सामन्यात सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २९ धावा केल्या होत्या.
हेही वाचा : RR vs KKR : गुवाहाटीत कोण राखणार वर्चस्व? हवामान अंदाज काय? जाणून घ्या दोन्ही संघांचे प्लेइंग-11..
सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देवीशा यांनी गोदरेज स्काय टेरेसेस, देवनार, मुंबई येथे 21.1 कोटी रुपये किंमतीचे दोन आलिशान फ्लॅट खरेदी केले आहेत. त्याचे एकूण कार्पेट क्षेत्रफळ अंदाजे 4,222.7 चौरस फूट आहे, 6 कार पार्किंगसह. करारावर ₹1.26 कोटी मुद्रांक शुल्क भरण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. हा व्यवहार २५ मार्च २०२५ रोजी नोंदणीकृत झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, माजी क्रिकेटपटू झहीर खानने एल्फिन्स्टन रोडवर 11 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले आहे.
सूर्यकुमार यादवने 139 आयपीएल सामने खेळळे आहेत. त्याने 124 डावात 3250 धावा केल्या असून त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 103 राहिलेली आहे. सूर्याचा स्ट्राइक रेट 143.3 आणि सरासरी 23.38 आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये(दि.23 मार्च) सामना रंगला होता. हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर चेपॉक येथे खेळवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिला सामना गमावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पहिले सामन्यामध्ये मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने कमालीचा खेळ दाखवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे होते. तर सीएसकेची धुरा ऋतुराज गायकवाडकडे आहे.