रियान पराग आणि अजिंक्य रहाणे(फोटो-सोशल मीडिया)
RR vs KKR : आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज म्हणजेच बुधवार(दि. 26 मार्च) रोजी खेळवण्यात येणार आहे. गुवाहाटी येथे संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणारा आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांनी या हंगामातील पहिला सामना गमावला आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. आरआरची धुरा रियान् परागकडे आहे तर केकेआरचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याआधी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात या हंगामातील पहिला सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला होता. त्या सामन्याच्या दिवशी कोलकात्यात सतत पाऊस पडत होता. मात्र, सामन्यावर पावसाचा कोणताही प्रभाव पडला नाही. आता अशा वेळी गुवाहाटीचे हवामान कसे असणार याची माहिती जाणून घ्यायची उत्सुकता आहे. त्यामुळे क्रिकेटचाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय असणार नाही.
गुवाहाटीमध्ये आज पावसाची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे सामन्यावर पावसाचे संकट असणार नाही. मात्र, गुवाहाटीमध्ये हवामान उष्ण राहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ताशी 9 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. पावसाबाबत अद्याप कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यामुळे आजचा सामना विनय अडथळा पार पडणार आहे.
गुवाहाटीची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असणार आहे. आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. तसेच या खेळपट्टीवर सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्यात फलंदाजांना यश आले आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकणारे संघ प्रथम गोलंदाजी करण्यास पसंती देता आले आहेत. कारण, रात्री दवाची भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे या खेळपट्टीवर गोलंदाजी करणे अवघड होऊन बसते.
हेही वाचा : Tamim Iqbal Health Update : तमीम इक्बालसाठी पुढील 72 तास धोक्याचे, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू…
आरआर आणि केकेआर संघांचे संभाव्य प्लेइंग-11
कोलकाता नाईट रायडर्स संघ – सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि स्पेन्सर जॉन्सन.
इम्पॅक्ट प्लेयर – वैभव अरोरा.
राजस्थान रॉयल्स संघ- रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश दीक्षाना, फजलहक फारुकी आणि तुषार देशपांडे.
इम्पॅक्ट प्लेयर – संदीप शर्मा.