श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मिडिया)
T20 Mumbai League : आयपीएलनंतर आता टी-२० मुंबई लीगचा थरार रंगला असून स्पर्धेची सुरुवात धमाकेदार झाली आहे. या लीगमध्ये भारतीय संघाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसून येत आहेत. या लीगमध्ये, भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या दोन प्रमुख स्टार्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या संघाने सोबो मुंबई फाल्कन्सने सूर्यकुमार यादवच्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्टवर बाजी मारली आहे. श्रेयस अय्यरच्या संघाने हा सामना ४ विकेट्सने आपल्या नावे केला आहे.
सामन्यापूर्वी सोबो मुंबई फाल्कन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना नाईट्स संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. जिगर सुरेंद्र राणा ७ चेंडू खेळू देखील आपले खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच वेळी, फलंदाज सिद्धांत अधातरावने एक टोक धरून हळूहळू धावसंख्या पुढे नेली.
हेही वाचा : Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी मोठी अपडेट; KCA च्या उच्च अधिकाऱ्यांचा राजीनामा
सलामीवीर सिद्धांत अधातरावला शेवटी सूर्यांश शेडगेने चांगली साथ दिली. दोघांमध्ये जवळजवळ अर्धशतकी भागीदारी झाली. सिद्धांत अधातरावने ५३ चेंडूत ५७ धावांची खेळी साकारली. तर सूर्यांशने २१ चेंडूत जलद ४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र आपल्या नाईट्ससाठी विशेष काही करू शकला नाही. तो १ धाव घेत बाद झाला. नाईट्स संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १४५ धावा केल्या होत्या. मुंबई फाल्कन्सकडून सिद्धार्थ राऊतने १, निखिल गिरीने १, कार्तिक मिश्राने १, यशने १ आणि विनायकने १ विकेट मिळवली.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘रोहित-विराटशिवायही विजय मिळवू..’, टीम इंडियाच्या नव्या कर्णधाराचे धाडसी विधान
प्रत्युत्तरात १४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई फाल्कन्स संघाने १९.२ षटकांत ६ गडी गमावून सामना आपल्या खिशात टाकला. मुंबई फाल्कन्सकडून अग्रिक रघुवंशीने २५ चेंडूत ४२ धावांची जलद खेळी केली. त्यानंतर इशान मुलचंदानीने ११ आणि श्रेयस अय्यरने १३ धावा केल्या. शेवटी, विनायक भोईरने ३३ आणि आकाश पारकरने ३० धावा करून सामना जिंकला.
इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय कसोटी संघ ब्रिटीश भूमीवर पोहोचला आहे. २० जूनल पहिल्या कसोटी सामन्याला सुरवात होणार आहे. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे चक्र देखील भारत आणि इंग्लंड यांच्यातील या मालिकेने सुरू होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून ब्रिटनला रवाना झाला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाची धुरा शुभमन गिलकडे देण्यात आली आहे.