रॅसी व्हॅन डर ड्यूसेन(फोटो-सोशल मीडिया)
T20 Tri-series : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका खेळली जाणार आहे. या टी-२० तिरंगी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने नवीन कर्णधारांची देखील निवड केली आहे. या टी-२० मालिकेसाठी रॅसी व्हॅन डर ड्यूसेनची कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ही टी-२० मालिका १४ ते २६ जुलै दरम्यान झिम्बाब्वेच्या हरारे येथे खेळवली जाणार आहे.
या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने १५ सदस्यीय संघात चार नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. कॉर्बिन बॉश, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रुबिन हरमन आणि सेनुरन मुथुसामी यांना तिरंगी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. अलिकडच्या काळात या चौघांनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
हेही वाचा : Shikhar Dhawan : गब्बर इज बॅक! शिखर धवनचा नव्या क्षेत्रात डेब्यू; ‘बॅट’ सोडून चालवली ‘लेखनी’..
पार्ल रॉयल्ससाठी SA20 स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या लुआन-ड्रे प्रिटोरियसने 166.00 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 397 धावा फटकावल्या होत्या. त्याने सनरायझर्स ईस्टर्न केपविरुद्ध 51 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी देखील केली होती. त्याच वेळी, रुबिन हरमनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 333 धावा केल्या होत्या. त्याने 41.43 च्या सरासरीने धावा काढल्या. त्याच वेळी, अनुभवी कॉर्बिन बॉशचाही संघात समावेश केला आहे.
दुखापतग्रस्त खेळाडूंचे संघात पुनरागमन
दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेले वेगवान गोलंदाज नॅंद्रे बर्गर आणि गेराल्ड कोएत्झी यांचे देखील संघात पुनरागमन झाले आहे. बर्गर कंबरेच्या स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बरा झाला आहे आणि ऑक्टोबर २०२४ नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय संघात सहभागी होणार आहे. त्याच वेळी, कोएत्झी आता पूर्णपणे तंदुरुस्त असून णि परतण्यास सज्ज झाला आहे.
हेही वाचा : Saudi T20 League : अरब देशांचा तहलका! आयपीएल-द हंड्रेडसारख्या स्पर्धांना धोका; ३४४२ कोटींची असणार मोठी लीग..
या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून तरुण खेळाडूंना अधिक संधी मिळू शकणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने देखील ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे तसेच ही मालिका कॉनराडची मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिली टी-२० आंतरराष्ट्रीय कामगिरी असणार आहे.
रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हिस, नॅन्ड्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, रीझा हेंड्रिक्स, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, क्वेना म्फाका, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, अँडिले सिमलेन.