
T20 World Cup 2026: A major change has taken place in the Indian team in the last year and a half! These World Cup-winning players will not be seen on the field.
T20 World Cup 2026 : बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या घोषणेनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल तर उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल जबाबदारी सांभाळलेल. भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि टी-20 उप-कर्णधार शुभमन गिलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर टी-२० संघात इशान किशनसह रिंकू सिंगचे पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ या स्पर्धेत पुन्हा एकदा जेतेपदाचा दावेदार असणार आहे. भारतीय संघ जाहीर झालेल्या २० संघांपैकी पहिला ठरला आहे. तथापि, यावेळी ट्रॉफी जिंकणारा संघ मागील संघापेक्षा लक्षणीयरीत्या वेगळा दिसून येत आहे. कारण संघात सात मोठे बदल करण्यात आले आहेत.
२० डिसेंबर रोजी, बीसीसीआयकडून विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. भारतीय संघ या विश्वचषकात आपले जेतेपद रखण्यास उत्सुक असणार आहे. या संघात कर्णधार सूर्यासह काही खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना विश्वचषकात खेळण्याचा अनुभव आहे आणि ते २०२४ च्या विजेत्या संघाचा देखील भाग राहीले होते. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यासह इतर खेळाडू आहेत, जे आपला पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत.
२०२४ आणि आगामी २०२६ च्या टी-२० विश्वचषक या दोन्ही संघांची तुलना केली तर सात खेळाडू आहेत जे २०२४ च्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग राहिले होते परंतु आता २०२६ च्या विश्वचषकात खेळताना दिसणार नाहीत. त्यापैकी सर्वात प्रमुख नावे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची आहेत. गेल्या विश्वचषक जिंकल्यानंतर या दोन्ही स्टार खेळाडूंनी या फॉरमॅटमधून निवृत्ती पत्करली होती.तसेच स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील निवृत्तीची घोषणा केली.
पण या व्यतिरिक्त, यावेळी चार खेळाडूंना संघातून डच्चू देण्यात अल आहे. अजित आगरकर त्यावेळी मुख्य निवडकर्ता होता आणि तो यावेळी देखील मुख्य निवडकर्ता आहे. आगरकरने ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल आणि युजवेंद्र चहल यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. यापैकी, यावेळी फक्त जयस्वाल संघात स्थान मिळू शकत होते, परंतु त्याला देखील नाकरण्यात आले.
या वेळी रोहित शर्माच्या जागी अभिषेक शर्माला डावाची सुरुवात करणार आहे. टीम इंडियामधून वगळल्यामुळे विश्वचषक गमावलेला इशान किशन देखील संघात परतला आहे. तथापि, इशान २०२१ च्या टी२० विश्वचषकाचा देखील भाग राहिला होता.
मागील, विश्वचषकात राखीव खेळाडूंमध्ये असलेल्या रिंकू सिंगला मुख्य संघात स्थान देण्यात आला आहे. फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, अव्वल क्रमांकाचा फलंदाज तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना देखील संघात स्थान मिळाले आहे. अभिषेक, तिलक, हर्षित, सुंदर, वरुण आणि रिंकू पहिल्यांदाच टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, टिळक वर्मा, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, हर्षित सिंह, हर्षित सिंह, आर.