
GT Vs RCB Final Live: अंपायरचा 'तो' एक निर्णय आणि खेळ पलटला; Washington Sundar चा Video Viral
वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून संभ्रम
गुजरात टायटन्सने आरसीबीला दिले 156 रन्सचे टार्गेट
वॉशिंग्टन सुंदरने केली शानदार अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 GT Vs RCB Final Live Updates: सध्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल 2026 चा अंतिम सामना सुरू आहे. दरम्यान आरसीबीने प्रथम गोलंदाजी केली. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून आरसीबीला 156 रन्सचे टार्गेट दिले आहे. मात्र गुजरातच्या खेळीमध्ये वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळाले होते. मात्र आता त्यावरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच तो आउट होता की नाही अशी चर्चा रंगली आहे.
गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. वॉशिंग्टन सुंदरने शानदार अर्धशतक करत गुजरातला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवले. मात्र त्याला 10 व्या ओव्हर्समध्ये एक जीवदान मिळाले होते. मात्र तो आउट होता की नाही यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. तयाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
10 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर एक मोठा वाड निर्माण झाला. जॅकब डफीच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरने शॉट मारला आणि जॉर्डन कॉक्सने त्याचा कॅच पकडल्याचे दिसून आले. सुंदर पॅव्हेलियनच्या दिशेने जात असतानाच थर्ड अंपायरने चेक केले असताना बॉल जमिनीला लागल्याचे दिसून आले. त्यामुळे सुंदरला जीवदान मिळाले. या संधीचा फायदा घेत सुंदरने नाबाद 50 धावा कुटल्या आणि गुजरातला 155 पर्यंत पोहोचवले. याकहा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या व्हीडिओवारून सुंदर आउट होता की नाही अशा चर्चा सुरू झाली आहे.
Gone… gone… DROPPED! 😱🤯 Big moment in the match as #WashingtonSundar is dropped in the deep by #JordanCox. 👀#TATAIPL 2026 FINAL | #RCBvGT | LIVE NOW 👉 https://t.co/nTKb3Qmpst pic.twitter.com/xUznFU4TBU — Star Sports (@StarSportsIndia) May 31, 2026
आरसीबीच्या भेदक माऱ्याने गुजरातला गुडघ्यावर टेकवलं
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2026 चा अंतिम सामना सुरू आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये ट्रॉफीसाठी लढत सुरू आहे रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आरसीबीने योग्य ठरवला. गुजरात टायटन्सचे प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. अखेर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 155 रन्स केल्या आहेत. आता दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबीला 156 रन्सची गरज असणार आहे.
जोस बटलर देखील आज चांगली खेळी करू शकला नाही. वॉशिंग्टन सुंदरला जीवदान मिळाले. अर्शद खानने 5 बॉलमध्ये 15 रन्स केल्या. 15 रन्सवर तो आउट झाला. जेसन होल्डर 7 रन्सवर आउट झाला. अंतिम सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून आले. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी करत गुजरातला सन्मानजनक स्कोअर करण्यात मदत केली.