
स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा लखनौ करणार प्रयत्न
हेड टू हेड रेकॉर्डमध्ये आरसीबीचे पारडे जड
एकाना स्टेडियम 7.30 वाजता सुरू होणार सामना
Tata IPL 2026 LSG Vs RCB Live Updates: आज संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध आरसीबी असा सामना होणार आहे. आयपीएलचा आजचा सामना हा 50 वा सामना असणार आहे. टॉप 4 मधले आपले स्थान अधिक पक्के करण्यासाठी आरसीबी हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर 9 पैकी केवळ 2 सामने जिंकलेला लखनौचा संघ शेवट स्पर्धेचा चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसेल.
हेड टू हेड रेकॉर्ड काय?
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीचे पारडे जड समजले जाते. 7 पैकी 5 सामने आरसीबीने जिंकले आहेत. तर लखनौचा संघ केवळ 2 सामने जिंकू शकला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात आरसीबीने लखनौवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात देखील आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे.
आता यंदाच्या हंगामात लखनौ आणि आरसीबीच्या कामगिरीचा विचार केल्यास, आरसीबीने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत. आरसीबी सध्या पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर लखनौचा संघ 9 पैकी केवळ 2 च सामने जिंकला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये लखनौचा संघ शेवटच्या स्थानावर आहे.
RCB Vs LSG Pitch Report: विराट कोहली विरुद्ध शामी? टॉस जिंकून थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
आजचा सामना लखनौच्या घरच्या मैदानावर म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर होणार आहे. येथील पीच थोडे स्लो असल्याने रन्स काढणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघाच्या फलंदाजांना जास्त मेहनत घेण्याची शक्यता आहे.
लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात आयपीएलचा 50 वा सामना होणार आहे. दरम्यान आज सामना होणाऱ्या खेळपट्टीचा पीच रिपोर्ट पाहुयात.आजचा सामना भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. येथील पीच काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे कधी बॉल वेगाने तर कधी थांबून बॅटवर येतो.
अब तु तो गया बेटा! ‘या’ बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार? बीसीसीआयने केली मोठी घोषणा
या हंगामात या स्टेडियमवरील सर्वाधिक धावसंख्या 155 ते 160 च्या आसपास आहे. मुळे आजचा सामना हाय-स्कोअरिंग असण्याची शक्यता कमी असून तो अटीतटीचा ठरू शकतो. सामना सुरू झाला की मधल्या काही ओव्हर्समध्ये स्पिनर्सला मदत मिळू शकते. टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या संघाला या ठिकाणी फायदा मिळाला आहे. त्यामुळे कोणताही संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.