वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात वर्णी? (फोटो- सोशल मिडिया)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात होणार वनडे सिरिज
बीसीसीआयने केले सर्वात मोठी घोषणा
BCCI To Vaibhav Suryvanshi/ Australia Series: बीसीसीआयने टीम इंडियाच्या आगामी दौऱ्याबद्दल घोषणा केली आहे. भारत लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनेक सामने खेळणार आहे. त्याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे. मात्र सिरिजची घोषणा होताच एका नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND Vs AUS) सिरिजमध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखला जात असणारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची निवड होण्याची शक्यता आहे.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. आक्रमक खेळीसाठी वैभवची ओळकह निर्माण झाली आहे. 15 वर्षीय वैभवचा फॉर्मपाहून बीसीसीआयने देखील त्याचा विचार केल्याचे पाहायला मिळत आहे. वैभवने आयपीएलमध्ये 10 सामने खेळून 404 रन्स केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील कायम आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचा विचार केला असल्याचे समजते आहे.
बीसीसीआयने भारत ऑस्ट्रेलिया सिरिजची घोषणा केली आहे. ही स्पर्धा मायदेशात खेळवली जाणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ दोन बलाढ्य संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पोंडीच्चेरीमध्ये हे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे हे कसोटी सामने 5 एवजी चार दिवस खेळले जाणार आहेत.
Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात? 18 वर्षांपेक्षा कमी वय अन्…; काय सांगतो कायदा?
बीसीसीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात भारत अंडर – 19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19 या दोन संघांमध्ये तीन वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. हे सामने राजकोट आणि अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशी सध्या आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे.
Vaibhav Suryvanshi वरून राजस्थान रॉयल्स गोत्यात?
आयपीएल 2026 च्या लिलावात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सामील करून घेण्यात आले. या ऐतिहासिक निवडीनंतर सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. इतक्या लहान वयात व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा ‘बालकामगार’ कायद्याचे उल्लंघन आहे का? 18 वर्षांखालील खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागाबाबत भारतीय कायदा आणि बीसीसीआयचे नियम काय सांगतात? हे जाणून घेऊयात.
वैभव सूर्यवंशीचा पाकिस्तानच्या बाबर आझमला धोबीपछाड! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये रचला ‘हा’ इतिहास
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभव सूर्यवंशीच्या वयावरून एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते आयपीएलमध्ये व्यावसायिक खेळात एका १५ वर्षांच्या किशोरवयीन मुलाला उतरवणे हे बालकामगार कायद्याचे आणि बालहक्कांचे उल्लंघन असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधित कार्यकर्त्याने पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे.






