MI vs KKR Live Streaming (फोटो- ians)
वानखेडेवर रंगणार आयपीएलचा थरार
रोहित विरुद्ध सुनील नारायण सामना
मुंबई विरुद्ध कोलकाता आमनेसामने
TATA IPL 2026 KKR vs MI Live Match: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात थरारक सामना होणार आहे. मुंबईचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात आणि कोलकाताचा संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माचा केकेआरविरुद्ध फॉर्म कसा असणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने टॉस जिंकूनप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाइट रायडर्स प्रथम फलंदाजी करणार आहे.
संध्याकाळी 730 वाजण्याच्या सुरुवातीस सामना सुरू होईल. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईकडून रोहित शर्मा ओपन करताना पाहायला मिळेल. त्याच्यासोबत कोण ओपन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तीन नंबरला तिलक वर्मा खेळण्यास येऊ शकतो. चार नंबरला सूर्यकुमार यादव येऊ शकतो. तसेच हार्दिक पंड्या आणि नमन धीर यांच्याकडून संघाला चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. तर गोलंदाजी देखील मुंबईची चांगली स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
IPL 2026: रोहितसाठी KKR चा संघ म्हणजे ‘बदाम हलवा’! माजी निवडकर्त्याच्या ‘त्या’ दाव्याने खळबळ
कसे असणार वानखेडेचे पीच?
मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे फलंदाजीसाठी उत्तम समजले जाते. या स्टेडियमवर चौकार, षटकार जास्त प्रमाणात लगावले जातात. पहिल्यांदा फलंदाजी केल्यास इथे 180 पर्यंत स्कोअर झाला आहे. तर धावांचा पाठलाग करताना इथला रेकॉर्ड हा 158 इतका आहे. आज मुंबईतील वातावरण मोकळे राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कोलकाता नाइट रायडर्सकडे देखील चांगला समतोल पाहायला मिळत आहे. यंदा अजिंक्य रहाणे केकेआरचे नेतृत्व करत आहे. फीन एलनसह तो ओपन करू शकतो. तसेच त्यांची गोलंदाजी देखील सक्षम पाहायला मिळत आहे.
Welcome to the live coverage of the TATA IPL 2026 Match no 2 between Mumbai Indians and Kolkata Knight Riders.https://t.co/JmJcgsoHQ7 #TATAIPL | #MIvKKR — IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर/अश्वनी कुमार, रदरफोर्ड, मिचेल सँटनर, विल जॅक्स
कोलकाता नाइट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार) आणि फिन्न ॲलन, अंगकृष रघुवंशी, कॅमेरॉन ग्रीन, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, सुनील नरेन, भव अरोरा, वरुण चक्रवर्ती, उमरान मलिक आणि सुयश शर्मा (इम्पॅक्ट प्लेयर)






