
रूको जरा सब्र करो! MI चा 'सिक्सर किंग' येतोय; IPL 2026 मध्ये पलटण 14 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडणार?
आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार सामना
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने
14 वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा मुंबईचा प्रयत्न
Tata IPL MI vs KKR Live: कालपासून आयपीएलच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. कालच्या सामन्यात बंगलोरने हैद्राबादला पराभूत केले आहे. तर आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात महामुकाबला होणार आहे. त्यामुळे आजचा रविवार क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाचा ठरणार आहे. तर आजच्या सामन्यात मुंबईचा संघ आपली 14 वर्षांची परंपरा मोडणार का हे पहावे लागणार आहे. चला तर मग याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स आपला आजचा सामना जिंकून 14 वर्षांपासूनची परंपरा मोडण्याचा प्रयत्न करेल. आज मुंबई पलटण याच इराद्याने मैदानात उतरेल. तर 14 वर्षांपासून असलेला तो रेकॉर्ड कोणता आहे ते पाहुयात. मुंबई इंडियन्सने तब्बल 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. मात्र गेले 14 वर्षांपासून त्यांना लीगमध्ये पहिला सामना जिंकता आलेला नाहीये. त्यामुळे आज हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मुंबई संघाकडे असणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाने 2012 मध्ये पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर 2025 पर्यंत मुंबई आपला पहिला सामना जिंकू शकलेली नाहीये. त्यामुळे आज मुंबई पलटण आपला 14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. दरम्यान दुसऱ्या संघाबाबत विचार केल्यास कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध एवढा काही खास रेकॉर्ड राहिलेला नाही.
IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?
केकेआरने मुंबईविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केवळ 12 पैकी 2 च सामने जिंकले आहेत. त्यामध्ये पहिला सामना 2012 मध्ये आणि दूसरा सामना 2024 मध्ये केकेआरने जिंकला होता. त्यामुळे आज केकेआर विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना होताना पाहायला मिळणार आहे.
येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह?
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यात खेळू शकणार की नाही अशी चिंता मुंबईच्या संघाला आणि चाहत्यांना भेडसावत आहे. आज मुंबईचा संघ कोलकताविरुद्ध सामना खेळणार आहे. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, जसप्रीत बुमराह आजचा सामना खेळण्यासाठी फिट असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता मिटली असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र सामना होण्याआधी काही दिवस जसप्रीत बुमराह संघासोबत जोडला गेला नव्हता. त्यामुळे चिंता वाढली होती.