
india vs sri lanka test
कोलंबो येथील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाअखेर श्रीलंकेचा पराभव जवळजवळ निश्चित मानला जात होता. मात्र, पाचव्या दिवशी श्रीलंकेच्या फलंदाजांनी केलेल्या अत्यंत संयमी आणि झुंजार फलंदाजीच्या बळावर सामना ड्रॉ राखण्यात यश मिळवले. त्यामुळे ही सिरिज भारताने 1-0 ने जिंकली आहे.
श्रीलंका संघ पहिल्या डावात 290 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला होता. चौथ्या दिवशी श्रीलंकेने 16 रन्सची आघाडी घेतली होती. त्यानंतर शेवटच्या दिवस श्रीलंकेने गाजवला. शेवटच्या 2 विकेट्ससाठी भारताला श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरश: रडवले. अखेर हा सामना ड्रॉ झाला.
IND Vs SL: भारताला लयं रडवलं! ट्रॉफी भारताची, पण हवा श्रीलंकेचीच; कोलंबो टेस्ट ड्रॉ अन् WTC मध्ये…
श्रीलंकेच्या पहिल्या डावात सोनल दीनुशाने शानदार शतकी खेळी केली होती. तसेच त्याने आज दुसऱ्या डावात देखील शानदार शतकी खेळी केली. तो शेवटपर्यंत नॉट आउट राहिला आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने मोठी आघाडी मिळवूनही दुसऱ्या डावात श्रीलंकेने ३९५/८ धावा उभारून सामना ड्रॉ केला आहे. शेवटच्या दिवशी सपाट ठरलेल्या खेळपट्टीवर श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांना आउट करण्यात भारताला अपयश आले. भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. मात्र सिरिज भारतीय संघाने जिंकली आहे. त्यातच आता हा सामना ड्रॉ झाल्याने भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
IND Vs SL: गूल, गूल दांडी गूल! Sonal Dinusha पडला टीम इंडियाला भारी, बॉलर्स रडकुंडीला
काय म्हणाला कर्णधार शुभमन गिल?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना ड्रॉ झाला आहे. त्यावर आता कर्णधार शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही मैदनवार जवळपास 250 पेक्षा जास्त ओव्हर्स फिल्डिंग केली. सामना जिंकण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न केले. मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी अत्यंत संयमी आणि चांगली फलंदाजी केली. दबावात असताना त्यांनी केलेले पुनरागमन पाहता त्यातून आमहालाही काही गोष्टी शिकायला मिळाल्या.