Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? पीसीबीचा मोठा निर्णय

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याची पाकिस्तान कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 04, 2026 | 04:56 PM
भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? (Photo Credit- X)

भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हरवणारा कर्णधार आता पाकिस्तानचा हेड कोच?
  • पीसीबीचा मोठा निर्णय
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ताज्या वृत्तानुसार, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याची पाकिस्तान कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. जर ही नियुक्ती झाली, तर सरफाराज हा ऑक्टोबर २०२५ पासून अंतरिम जबाबदारी सांभाळणाऱ्या अझहर महमूदची जागा घेईल.

विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर PCB वर दबाव

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. संघाची रणनीती, खेळाडूंची निवड प्रक्रिया आणि कमकुवत कोचिंग सेटअपवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटमध्ये स्थैर्य आणण्यासाठी आणि संघाला नवी दिशा देण्यासाठी पीसीबी आता एका खंबीर नेतृत्वाच्या शोधात आहे. सरफराजची शिस्त आणि खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता लक्षात घेता, त्याच्या नावाचा गांभीर्याने विचार केला जात आहे.

युएई दौरा आणि आगामी बांगलादेश मालिका

माहितीनुसार, सरफराज अहमद नुकताच ‘पाकिस्तान शाहिन्स’ संघासोबत युएई दौऱ्यावर होता. तिथे इंग्लंड लायन्सविरुद्ध मालिका खेळवली जाणार होती, परंतु प्रादेशिक तणावामुळे इंग्लंडने हा दौरा स्थगित केला. असे असूनही, बोर्डाने सरफराज अहमदला मोठी जबाबदारी देण्याचे संकेत दिले आहेत. मे २०२६ मध्ये बांगलादेशविरुद्ध प्रस्तावित असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सरफराज अहमद अधिकृतपणे पदभार स्वीकारू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

काय सांगता! US-Iran तणावामुळे IND Vs ENG T20 World Cup 2026 सेमी फायनल मॅच होणार रद्द? वाचा मोठी अपडेट

कनिष्ठ स्तरावरील यशानंतर वाढला विश्वास

सरफराज अहमदने गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानच्या १९ वर्षांखालील (Under-19) संघासोबत मार्गदर्शक (Mentor) म्हणून काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानने आशिया चषक जिंकला, जिथे त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. या यशामुळे सरफराज अहमदच्या रणनीतिक कौशल्याचे प्रचंड कौतुक झाले. पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी हे देखील सरफराज अहमदच्या कामावर समाधानी असून, त्यांनीच या बदलासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.

आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा शेवटचा कर्णधार

सरफराज अहमद हा पाकिस्तानचा असा कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१७ मध्ये भारताचा पराभव करून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. प्रदीर्घ काळ संघाचे नेतृत्व करणाऱ्या सरफराज अहमदने ५४ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, खेळाडू म्हणून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना थेट मुख्य प्रशिक्षक म्हणून कसोटी संघाची धुरा सांभाळणे, हे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात कठीण आव्हान मानले जात आहे.

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Web Title: The captain who defeated india in the champions trophy final is now pakistans head coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • cricket news
  • PCB Cricket

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.