गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs END : आयपीएल २०२५ नंतर भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. २० जूनपासून संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे कर्णधार पदाची धुरा दिली आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण ही मालिका २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळवली जाणार आहे.
अशा परिस्थितीत, दोन्ही संघ ही मालिका जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर या मालिकेविषयी खूप उत्साहित असल्याचे दिसत आहेत. नुकतीच त्यांनी कामाख्या मातेच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेपूर्वी, प्रशिक्षक गौतम गंभीरने ५२ शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कामाख्या मातेच्या मंदिराला भेट दिली आहे. गंभीर २६ मे रोजी गुवाहाटी येथील मां कामाख्या मंदिरात जाऊन पोहोचला. येथे त्याने मंदिरात पूजा देखील केली. आसामची राजधानी दिसपूरपासून १० किलोमीटर अंतरावर नीलाचल टेकड्यांमध्ये कामाख्या मातेचे मंदिर आहे. गौतम गंभीर हा ८ महिन्यांत दुसऱ्यांदा कामाख्या मातेचे दर्शन घेण्यासाठी आला होता.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गेल्या वर्षी कामाख्या मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. असे मानले जाते की जो कोणी या मंदिरात तीन वेळा दर्शनासाठी येत असतो, त्याची इच्छा पूर्ण होत असते. यानंतर त्याच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात.
हेही वाचा : IPL 2025 : ‘पण BCCI ने त्याला कोणताही आदर..’ महिला क्रिकेटपटूचे बोर्डावर गंभीर ताशेरे, वाचा प्रकरण काय?
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद जैस्वाल, वॉशिंगटन सनदरा, वॉशिंग्टन, वॉशिंग्टन, वॉशिंग्टन. कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.