स्टेडियम(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026 : पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका या देशात संयुक्तपणे आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी जोरात तयारी सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु त्यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून सामन्यांसाठी संभाव्य ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयने टी२० विश्वचषक आयोजित करण्यासाठी भारतातील पाच प्रमुख शहरांची निवड केली असून ज्यामध्ये अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम फेरीसाठी निश्चित केले आहे.
हेही वाचा : IND vs AUS 4th T20I : गोल्ड कोस्टमध्ये भारताचा ‘सुंदर’बोलबाला! कांगारूंचा 48 धावांनी पराभव
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या अलिकडेच एक बैठक पार पडले. या बैठकीत, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक २०२६ पेक्षा कमी शहरांमध्ये टी२० विश्वचषक २०२६ आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. बीसीसीआयने प्राधान्य दिलेल्या शहरांमध्ये अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी अंदाजे सहा सामने खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच नाही तर जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्यामुळे अंतिम फेरीसाठी त्याची निवड निश्चित करण्यात आल्याचे मानले जात आहे.
वृत्तानुसार, श्रीलंकेतील तीन स्टेडियममध्ये विश्वचषक सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे. अद्याप याबबत काही एक स्पष्ट झालेले नाही. या स्थळांबाबत आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीसीसीआयकडून असे देखील ठरवण्यात आले आहे की, आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये ज्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले होते ते स्टेडियम यावेळी टी२० विश्वचषकच्या निवड यादीतून वगळण्यात येतील. याचा अर्थ गुवाहाटी, विशाखापट्टणम, इंदूर आणि नवी मुंबई सारखी शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार नाही.
आयसीसीकडून बीसीसीआयला स्पष्टपणे निर्देश एनयात आले आहे की, जर श्रीलंका उपांत्य फेरीत पोहोचला तर भारतीय संघाला कोलंबोमध्ये खेळावे लागणार आहे. तथापि, जर पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचला तर सामना तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येईल.






