लॉरा वोल्वार्डन आणि स्मृती मानधना (फोटो-सोशल मिडिया)
हेही वाचा : IND vs AUS 4th T20I : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर168 धावांचे लक्ष्य! नॅथन एलिसची धारधार गोलंदाजी
२०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जेतेपदावर भारताने आपले नाव कोरले. या स्पर्धेत भारताच्या जेतेपदाच्या विजयात स्मृती मानधनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे स्पर्धेत अनेक वेळा संघाला मजबूत आघाडी मिळवून देण्यात मदत झाली. स्मृती मानधनाने नऊ सामन्यांमध्ये ५४.२५ च्या सरासरीने ४३४ धावा फटकावल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा देखील समावेश आहे. तसेच नामांकनाच्या यादीत दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डनचे देखील नाव आहे. या विश्वचषकात वोल्वार्डनने ऑस्ट्रेलियासाठी उल्लेखनीय ५७१ धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरनेही चेंडूने महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. तीला देखील प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले आहे.
आयसीसीने पुरुष गटात ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथसाठी तीन खेळाडूंना नामांकन दिले आहे. दक्षिण आफ्रिकेचा सेनुरन मुथुसामी, पाकिस्तानचा नौमान अली आणि अफगाणिस्तानचा रशीद खान, यांचा या यादीत समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुसामीने पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले आहे. त्याने चेंडूने ११ बळी घेतले आणि फलंदाजीने १०६ धावा काढल्या आहेत.
पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज नौमान अलीने देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शानदार गोलंदाजी करत एकूण १४ बळी टिपले. दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खानने ऑक्टोबरमध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्वरूपात प्रभावी कामगिरी केली. त्याने टी-२० सामन्यांमध्ये ९ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहे.
हेही वाचा : WPL 2026 : RCB मध्ये बदलाला सुरुवात! मिळाला नवीन मुख्य प्रशिक्षक; सहा वर्षे सपोर्ट स्टाफचा भाग
आयसीसीकडून निवडण्यात आलेल्या दोन्ही श्रेणींमध्ये स्पर्धा खूप मनोरंजक अशी आहे. महिला गटात मानधना, वोल्वार्ड आणि गार्डनर शर्यतीत असणार आहेत. तर पुरुष गटामध्ये, मुथुसामी, नौमन अली आणि रशीद खान त्यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. त्यामुळे आता ऑक्टोबर २०२५ च्या महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे.






