आज आयपीएलचे (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (RR vs KKR)मध्ये होणार लढत होणार आहे. हा सामना १८ एप्रिल (सोमवार) रोजी खेळवला जाणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांचे गुणतालिकेत स्थान पाहिल्यास राजस्थानचा संघ चौथ्या स्थानावर आहे. त्यांचे पाच सामन्यांत सहा गुण आहेत. त्याचबरोबर कोलकात्याचे सहा सामन्यात सहा गुण आहेत. हा संघ पॉईंट्स टेबलवर सहाव्या क्रमांकावर आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर होईल.