नेपाळकडून स्कॉटलंडचा 7 विकेट्सने पराभव(फोटो-सोशल मीडिया)
EP vs SCO, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३३ व्या सामन्यात नेपाळ आणि स्कॉटलंड आमनेसामने होते. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात नेपाळने स्कॉटलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. स्कॉटलंड संघाने प्रथम फलंदाजी करत मायकेल जोन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून १७० धावा केल्या. प्रतिउत्तरात नेपाळ संघाने दीपेंद्र सिंग ऐरीच्या अर्धशतकाच्या जोरावर १९.२ षटकात १७१ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळवला. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
स्कॉटलंडने दिलेल्या १७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या नेपाळ संघाने चांगली सुरुवात केली. कुशल भुर्तेल आणि आसिफ शेख या सलामीवीरांनी ७४ धावांची भागीदारी रचली. कुशल भुर्तेल ४३ धावा तर आसिफ शेख ३३ धावा करून माघारी गेले. कर्णधार रोहित पौडेल १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर दीपेंद्र सिंग ऐरी आणि गुलसन झा यांनी डाव सांभाळत नेपाळ संघाचा विजय निश्चित केला. दीपेंद्र सिंग ऐरीने २३ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांची खेळी केली. तर गुलशन झा १७ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या. स्कॉटलंडकडून मायकेल लीस्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
यापूर्वी, या सामन्यात नेपाळ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. स्कॉटलंड संघाची सुरुवात चांगली झाली. जॉर्ज मुन्से आणि मायकेल जोन्स या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १० ओव्हरमध्ये ८० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर जॉर्ज मुन्से २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर ब्रँडन मॅकमुलेन आणि मायकल जोन्स यांनी डाव सावरत ५० धावांची भागीदारी रचली. २५ धावा करून ब्रँडन मॅकमुलेन माघारी गेला. त्यानंतर मात्र स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मायकल जोन्सने शानदार अर्धशतक लगावून संघाला १७० पर्यंत पोहचवले. त्याने ४५ चेंडूत ७१ धावांची खेळी करून महत्वपूर्ण योगदान दिले. त्यानंतर तो बाद झाला. नेपाळकडून(आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६)सोमपाल कामीने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या आहेत.तर नंदन यादवने २ विकेट्स घेतल्या.
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन: जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मायकेल लीस्क, मॅथ्यू क्रॉस (कर्णधार), मार्क वॅट, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी
नेपाळ प्लेइंग इलेव्हन: कुशल भुर्तेल, आसिफ शेख, रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, संदीप जोरा, गुलसन झा, सोमपाल कामी, नंदन यादव, संदीप लामिछाने






