फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध बांग्लादेश : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सध्या ३ सामान्यांची T20 मालिका सुरु आहे. या मालिकेचे दोन सामने पार पडले आहेत, या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. भारताच्या युवा खेळाडूंनी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली कमालीची कामगिरी करत दोन्ही सामने नावावर केले आहेत. टीम इंडियामध्ये भारताच्या संघात वरूण चक्रवर्तीचे पुनरागमन झाले आहे त्याने संघामध्ये येताच कमाल केली. आता भारताचा संघाची नजर तिसऱ्या सामन्यावर असणार आहे. आज भारताच्या संघामध्ये बदल होऊ शकतात ज्या खेळाडूंना संघामध्ये आतापर्यत खेळण्याची संधी मिळाली नाही त्यांना आज कॅप्टन सूर्यकुमार आज संघामध्ये स्थान देऊ शकते.
आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये तिसरा T20 सामना हा राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम रंगणार आहे या खेळपट्टीवर एकदा नजर टाका. हैदराबादच्या या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत होणार आहे की, गोलंदाजाना यावर एकदा प्रकाश टाका.
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. आतापर्यंत भारतीय संघाने या मैदानावर २ T20 सामने खेळले असून, दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, आता या मैदानावर ५ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये नाणेफेक खूप महत्वाची आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे लक्ष्याचा पाठलाग करण्यास प्राधान्य देतो. आतापर्यंत या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला २ विजय मिळाले आहेत. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही, पण फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळू शकते. या खेळपट्टीवर फलंदाजांना रोखणे हे गोलंदाजांसाठी मोठे आव्हान होते.
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema वर पाहता येणार आहे.






