बंगळूरु: आजकाल सोशल मीडियाचा वापर करुन ऑनलाईन अश्लील वीडियो, मेसेज पाठवण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. ओळख नसताना ओळख प्रस्थापित केली जाते आणि नंतर अश्लील मेसेज वीडियो पाठवले जातात अशा अनेक घटना आपण वाचल्या आहेत. बंगळूरूतील एका अभिनेत्रीला अशाच घटनेला सामोर जाव लागल आहे. या अभिनेत्रीला एक जण वारंवार सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि वीडियो पाठवत असायचा म्हणून या सगळ्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केल होत. मात्र त्या नंतर त्याचा राग अनावर झाला. त्याने एका नंबर वरून जरी ब्लॉक केल असलं तरी दुसऱ्या अकाऊंट वरून थेट गुप्तांगाचा वीडियो अभिनेत्रीला पाठवला. या सगळ्या प्रकाराने अभिनेत्री संतापली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एकाला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला ताब्यात पण घेतलं आहे.
ऑनलाइन पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट
या अभिनेत्रीला नजीज नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ओळख नसताना ही त्याने मैसेंजरला मेसेज करायला सुरुवात केली. तो तिला अश्लील मेसेज पाठवायचा. या नंतर अभिनेत्रीने त्याला त्या अकाऊंट वरून ब्लॉक केल होत. मात्र तरीही त्याने दूसर नवीन अकाऊंट काढलं आणि त्या अकाऊंट वरून थेट गुप्तांगाचा वीडियो पाठवला. त्याना सांगूनही तो वारंवार मेसेज करत होता. अभिनेत्रीने त्या विरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
या आधी अभिनेत्रीने त्याला भेटायला बोलावल होत
तो आरोपी तिला वारंवार असले अश्लील मेसेज करत होता. म्हणून तिने त्याला भेटायला बोलावल होत. एका ठिकाणी थांब अस सांगून अभिनेत्री आली. त्याला कडक शब्दात समज दिली तरीही तो काही ऐकला नाही. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल आणि मेसेज करत राहिला. अखेर कंटाळून तिने पोलिसात तक्रार दिली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. १ नोव्हेंबरला पोलिसांनी रात्री त्याला अटक केली आहे. आणखी कोणाला तो सोशल मीडियावर त्रास देत होता. याची चौकशी पोलीस करत आहेत.






