Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Capitals च्या Abishek Porel कायद्याच्या कचाट्यात, लवकरच होणार अटक; महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप

बंगालचा यष्टीरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेल मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 21, 2026 | 09:26 AM
धक्कादायक! बलात्काराच्या आरोपाखाली क्रिकेटर अभिषेक पोरेलला होणार अटक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

धक्कादायक! बलात्काराच्या आरोपाखाली क्रिकेटर अभिषेक पोरेलला होणार अटक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटर अभिषेक पोरेल कायद्याच्या कचाट्यात 
  • एका महिलेने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे
  • अभिषेक इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालकडून आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्याच्या अटकेचे आदेश दिले आहेत. हे अटकेचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार महिलेचे फोटो व्हायरल होऊ नयेत यासाठी पोरेलची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे निर्देशही न्यायालयाने मोगरा पोलिसांना दिले आहेत.

या महिलेचा आरोप आहे की, क्रिकेटपटूने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्यांच्या खाजगी क्षणांचे चित्रीकरण केले. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे, “याचिकाकर्त्याकडून एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. पेन ड्राइव्हवर सापडलेल्या काही पुराव्यांवरून हे सिद्ध होते की, पोरेलची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यासाठी त्याला अटक करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यातील डेटा इतरांसोबत शेअर केला जाऊ नये.”

तीन वर्षे शारीरिक संबंध, मारहाण अन्…; क्रिकेटपटू Abhishek Porel कायद्याच्या कचाट्यात, गंभीर प्रकरण काय?

तीन वर्षे जुन्या प्रकरणात पोरेल अडचणीत

‘द इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या अभिषेक पोरेलने जानेवारी २०२३ मध्ये तक्रारदार महिलेशी संपर्क साधला होता, त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. २३ वर्षीय क्रिकेटपटूवर आरोप आहे की, त्याचे आई-वडील बाहेरगावी असताना त्याने त्या महिलेला मानकुंदू येथील आपल्या फ्लॅटमध्ये नेले.

तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, पोरेलने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. नंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाबद्दल चर्चा झाली असली तरी, तक्रारदार महिलेने नंतर आरोप केला की, पोरेलचे इतर महिलांसोबतही शारीरिक संबंध असल्याचे तिला समजले.

मोगरा पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार

मोगरा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “अभिषेक पोरेलने याचिकाकर्तीला बेकायदेशीरपणे डांबून ठेवले, तिला जेवण करण्यापासून रोखले आणि जाणीवपूर्वक तिला एकाकी पाडले. २ एप्रिल २०२६ रोजी दिल्लीत घडलेल्या या घटनेमुळे, याचिकाकर्ती अत्यंत अशक्त झाली आणि तिला नीट चालता येत नव्हते. दुसऱ्या दिवशी विमानप्रवासाचे नियोजन असूनही, झालेल्या जखमांमुळे याचिकाकर्तीला तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी लागली.”

अभिषेक पोरेलचे करिअर या प्रकरणामुळे संपुष्टात आले असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान अभिषेक पोरेलने एकदाही या प्रकरणावर कोणतेही स्पष्टीकरण वा मुलाखत दिलेली नाही. त्यामुळे अभिषेक खरंच दोषी आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

Web Title: Delhi capitals player cricketer abishek porel to be arrested in assault case high court issues order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • cricket news
  • Delhi Capitals
  • Molestation Case

संबंधित बातम्या

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई
1

IND vs ENG: लॉर्ड्सवर इंग्लंडचा धमाका! डकेट-बेथेल जोडीने मोडीत काढला ४६ वर्षांपूर्वीचा महाविक्रम; भारताच्या गोलंदाजांची धुलाई

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी
2

Rohit-Virat: लॉर्ड्सच्या मैदानावर ‘हिटमॅन’ आणि ‘किंग’ कोहलीचा धमाका, एकत्र 400 सामने खेळण्याचा टप्पा गाठणारी पहिलीच भारतीय जोडी

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?
3

Smriti Mandhana Birthday: भारताची शान, कोट्यावधी मुलींची प्रेरणा; स्मृतीच्या जिद्दीचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का?

‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद
4

‘राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ…’; OCI च्या ‘त्या’ याचिकेवर बीसीसीआयचा मुंबई हायकोर्टात युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.