(फोटो सौजन्य - Social Media)
यावेळच्या वर्ल्डकपमध्ये दोन ऐतिहासिक स्टेडियमवर हे हाय-व्होल्टेज सामने होणार आहेत. पहिली सेमीफायनल ही 4 मार्च 2026 रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. तर दुसरी सेमीफायनल ही 5 मार्च 2026 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि इंग्लंड एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
निसर्ग कोणाच्याही कंट्रोलमध्ये नसतो. त्यामुळे ICC ने Knockout Stage सामन्यांसाठी विशेष तरतूद केली आहे. 5 मार्च रोजी मुंबईत भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि खेळ थांबवावा लागला, तर सर्वात आधी ‘रिझर्व्ह डे’ म्हणजेच राखीव दिवसाचा नियम लागू होईल.
उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी ICC ने प्रत्येकी एक अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे. जर 5 मार्च रोजी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो 6 मार्च रोजी जिथे थांबला होता तिथूनच पुन्हा सुरू केला जाईल. प्रेक्षकांसाठी ही दिलासादायक बाब असली, तरी खरी अडचण तेव्हा येते जेव्हा राखीव दिवशीही पाऊस थांबत नसेल तर काय होणार?
जर दुर्दैवाने राखीव दिवशीही पाऊस पडला आणि एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला, तर चेंडू आणि बॅटचा खेळ बाजूला राहून आकड्यांचा खेळ सुरू होतो. ICC च्या नियमानुसार, अशा परिस्थितीत ज्या संघाने ‘सुपर ८’ (Super 8) फेरीत आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. असा संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो.
या नियमानुसार जर दोन्ही उपांत्य सामने पावसामुळे होऊ शकले नाहीत. तर आपल्या गटात अव्वल स्थानी असलेले दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करतील. भारतीय चाहत्यांसाठी ही चिंतेची बाब असू शकते. कारण गुणतालिकेतील स्थान अशा वेळी निर्णायक ठरते.
Semi-finals सामन्यांमध्ये निकालासाठी5-5 ओव्हर्सचा खेळ होणे पुरेसं असतं. मात्र, ICC च्या नवीन नियमांनुसार, वर्ल्डकपच्या उपांत्य आणि अंतिम सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही डावांत किमान 10-10 ओव्हर्स खेळल्या जाणे अनिवार्य आहे. जर 10 ओव्हर्सचा खेळ झाला नाही, तरच तो सामना अनिर्णित मानून राखीव दिवसाचा किंवा गुणतालिकेचा आधार घेतला जातो. एकूणच, मैदानावरील खेळाडूंप्रमाणेच आता चाहत्यांच्या नजरा आकाशाकडेही लागल्या आहेत. 5 मार्चला वानखेडेवर पावसाने विश्रांती घेतली, तरच क्रिकेटप्रेमींना भारत आणि इंग्लंडमधील अटीतटीची लढत पाहायला मिळेल.






