विनेश फोगट अपात्र
महिला कुस्ती 50 किग्रॅ. या प्रकारात अंतिम फेरी गाठणारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिचे ऑलिम्पिक पदक थोडक्यासाठी हिरावले गेले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटला अपात्र ठरवण्यात आले आहे. याचे कारण त्याचे वजन हे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, विनेश फोगटचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले आहे. नियमांनुसार, कोणत्याही कुस्तीपटूला कोणत्याही श्रेणीमध्ये केवळ 100 ग्रॅम जास्त वजन भत्ता दिला जातो, परंतु विनेशचे वजन यापेक्षा जास्त होते, त्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – ANI)
मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत धडक
उपांत्य फेरीत विनेश फोगटने क्यूबन कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला. तिच्या श्रेणीतील पहिल्या सामन्यात तिचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि जागतिक विजेता जपानच्या युई सुसाकीशी झाला. विनेशने सुसाकीचा 3-2 असा पराभव केला होता. त्यानंतर तिने इतिहास रचत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र आता सर्वांच्या पदरी निराशा आली आहे.
असा होता विनेशचा प्रवास
प्री-क्वार्टर फायनलमध्ये विनेशने जपानच्या ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव केला. सुसाकी ही चार वेळा विश्वविजेती आहे आणि टोकियो ऑलिम्पिकची सुवर्णपदक विजेती सुसाकीने तिचे सर्व 82 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पण, विनेशने स्वतःच्या युक्तीने सुसाकीचा पराभव केला.
सुसाकी कुस्तीमधील टेक-डाउन मॅन्युव्हर्समध्ये तज्ज्ञ आहे. सुसाकीनेही विनेशविरुद्ध त्याचाच वापर केला. पण तिची चाल उलटली कारण विनेशनेही तीच युक्ती वापरून आघाडी घेतली आणि विजय मिळवला.
हेदेखील वाचा – विनेश फोगाटची विजयी गाथा! लागोपाठ दोन सामन्यांत विजय; अवघ्या तासाभरात दुसरा विजय