Viral Video: As soon as Yuzvendra Chahal was seen with the mystery girl, Vivek Oberoi asked 'this' question, he burst into laughter as soon as he answered...
IND vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात (दि. 9 मार्च) चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचे आव्हान दिले होते. . या मॅचमध्ये युजवेंद्र चहलही मॅच पाहताना दिसून आला होता. पण, यावेळी तो एका मिस्ट्री गर्लसोबत स्टँडवर बसलेला दिसला. यावेळी त्यांच्यासोबत बसलेला अभिनेता विवेक ओबेरॉयचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुढे काय घडलं ही माहिती करून घेऊया.
फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. त्यांनंतर युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो एका मुलीसोबत स्टँडवर बसून सामना बघताना दिसून आला आहे. ती मुलगी त्याची कथीत गर्लफ्रेंड आरजे मैहवश असल्याचे बोलले जाता आहे. ते दोघे जेथे सामना पाहायला बसले होते, त्याच ठिकाणी अभिनेता विवेक ओबेरॉय देखील बसलेला होता. विवेकने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामना पाहातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये न्यूझीलंडने भारताला धावांचं टार्गेट दिल्यानंतर विवेक ओबेरॉयने युझवेंद्र चहलला भारत जिंकणार का? असा एक प्रश्न विचारला होता. त्यावर चहलने उत्तर दिले की ‘हो नक्कीच! आरामात जिंकणार.’ ते उत्तर ऐकून चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे मैहवश त्यावेळी हसताना दिसून आली. हा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल हॉट आहे.
Spin master @yuzi_chahal in our box, spinning the winning energy for team India, cheering with us! Thank you bro for being an inspiration to so many young cricketers.#ChampionsTrophy2025 pic.twitter.com/UWKOetz9MN
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) March 9, 2025
स्टँडमध्ये युजवेंद्र चहलसोबत बसलेली ती मुलगी एक प्रभावशाली यूटयूबर आहे. ती रेडिओ जॉकी सुद्धा आहे. आरजे महवाश असे त्या मुलीचे नाव असून यापूर्वीही ती युझवेंद्र चहलसोबत दिसून आली होती. त्यावेळी देखील या दोघांचा एकत्र फोटो पाहून लोकांनी असाच काहीसा अंदाज लावला होता की चहल धनश्री वर्मापासून वेगळा झाल्यानंतर आरजे महवाशला तो डेट करत आहे. मात्र, त्यानंतर महवाशने तिच्या इन्स्टाग्रामवर या बातम्यांचे खंडन केले होते.
युजवेंद्र आणि धनश्री वेगळे..
युजवेंद्र चहल आणि डान्सर धनश्री वर्मा यांचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला आहे. काही महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षातच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे घटस्फोटाला एक महिना देखील झाला आणि युजवेंद्र चहलचे नाव दुसऱ्या मुलीसोबत जोडले जात आहे.