IND vs NZ Final : 'आम्ही शेवटपर्यंत कडवी झुंज दिली पण...'(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ Final : टीम इंडियाने 12 वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव केला आहे. या मध्ये रोहित शर्माच्या अर्धशतकाचे मोठे योगदान आहे. तसेच भारतीय फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने शेवटपर्यंत हार मानली नाही. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ स्पर्धा पाहायला मिळाली. फायनल सामन्यात पराभव पत्करल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या असाधारण खेळीमुळे दोन्ही संघांच्या कामगिरीमध्ये अंतर निर्माण झाले.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सॅन्टनर म्हणाला की, रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळला, त्यामुळे सामना आमच्या आवाक्याबाहेर निघून गेला, असे मला वाटते. तसेच भारताने दुबईतील परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतली आणि चांगला खेळ केला. मला वाटते की, तो एक कडू गोड शेवट होता. तसेच सँटनर पुढे म्हणाला की, जेतेपदाच्या लढतीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला असला, तरी मला आमच्या संघाचा अभिमान आहे.
हेही वाचा : Budget 2025 : ‘या’ चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात भरघोस वाढ: अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा..
न्यूझीलंडचा कर्णधार सॅन्टनर पुढे म्हणाला की, अंतिम फेरीत आमचा सामना एका चांगल्या संघाशी झाला होता. संपूर्ण खेळात आम्हाला मोठे आव्हान देण्यात आले, जे छान होते आणि मला वाटते की कदाचित असे काही क्षण आहेत, जिथे आम्ही ते आमच्यापासून दूर जाऊ दिले. पण हो, या संपूर्ण स्पर्धेत आम्ही या संघासोबत ज्या पद्धतीने खेळलो त्याचा मला खूप अभिमान आहे. सॅन्टनर म्हणाला की, त्यांचा संघ दुबईतील खेळपट्टी आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज होता. जी की लाहोरपेक्षा खूपच वेगळे होती. जेथे न्यूझीलंडने उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते.
सॅन्टनर म्हणाला की, आम्ही भारताविरुद्ध सतत खेळत आहोत जे आमच्यासाठी नेहमीच एक आव्हान असते. उपांत्य फेरीपेक्षा अंतिम सामन्यात परिस्थिती थोडी वेगळी असेल, हे आम्हाला माहीत होते. पण, आम्ही त्यासाठी सज्ज होतो. तरीही आम्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आणि भारताला शेवटपर्यंत लढा दिला. पण, प्रत्येक सामन्यात असे काही क्षण असतात जिथे तुम्ही संभाव्य सुधारणा करू शकतात.
हेही वाचा : IND vs NZ Final : या पाकिस्तानचं करायचं काय? ‘गावस्कर शारजातून पळाले’, इंझमाम उल हक बरळला..
न्यूझीलंडच्या कर्णधाराने हे कबूल केले की त्याला मॅट हेन्रीची उणीव भासलीअ आहे. ज्याला खांद्याच्या दुखापतीमुळे विजेतेपदाच्या सामन्यातून बाहेर जावे लागले. वेगवान गोलंदाज हेन्री या स्पर्धेत सर्वाधिक 10 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. सँटनर पुढे म्हणाला की, तो एक उत्कृष्ट गोलंदाज आहे.