'या' चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात भरघोस वाढ: अर्थमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा..(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs NZ Final : या पाकिस्तानचं करायचं काय? ‘गावस्कर शारजातून पळाले’, इंझमाम उल हक बरळला..
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज (दि. 10 मार्च) रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. छत्रपति शिवाजी महाराज चषक कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा आणि भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. या क्रीडांच्या अनुदानात प्रत्येकी 75 लाखावरुन आता 1 कोटी रुपये वाढ करण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल अशी घोषणा देखील अजित पवारांनी केली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यामध्ये कोकणातील संगमेश्वर हे एक महत्वाचे ठिकाण आहे. औरंगजेबाच्या सेनेशी दोन हात करताना महाराजांनी आपल्या शूर मावळ्यांना घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली होती. स्वराज्यासाठी आपले बलिदान देणाऱ्या राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.