Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू तुझे काम…’; Kane Williamson च्या निवृत्तीवर Virat Kohli भावुक; शेअर केली खास पोस्ट

Virat Kohli Heartfelt Post for Kane Williamson retirement: न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियमसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 13, 2026 | 03:40 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • केन विल्यमसनच्या निवृत्तीवर विराट कोहली भावुक
  • सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
  • विल्यमसनसाठी विराटचा खास निरोप
न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने शुक्रवारी (दि. १२ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या शांत स्वभाव, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण कामगिरीने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या विल्यमसनला जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही विल्यमसनच्या निवृत्तीवर आपली भावना व्यक्त केली. कोहलीने सोशल मीडियावर केन विलियमसनसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. कोहलीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ENG W vs SL W: महिला T20 विश्वचषकाची दणदणीत सुरुवात! इंग्लंडचा श्रीलंकेवर विजय; मोडले अनेक विक्रम

‘विरोधक ते मित्र’ विराटचा कोहलीची खास पोस्ट

विराट कोहलीने विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, ‘गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून खऱ्या मित्रापर्यंतचा हा प्रवास राहिला आहे. तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा एक उत्तम अनुभव होता. त्याहूनही अधिक, मी आपल्या मैत्रीला आणि खेळाबद्दल व त्यापलीकडच्या आपल्या विचारांना महत्त्व देतो. जेव्हा जेव्हा आपण बोलतो किंवा भेटतो, तो क्षण मी नेहमीच जपतो. तुला नेहमीच खूप खूप शुभेच्छा ब्रदर. तू तुझे काम केलं आहेस आता तू या प्रवासाचा आनंद घेण्यास आणि आराम करण्यास मोकळा आहेस. शाब्बास मित्रा, आयुष्य आता कुठे सुरू झाले आहे.’

From an opponent to a friend over the years. It’s been a pleasure watching you bat and compete against you over so many years but more than that I value our friendship and shared perspectives on the game and beyond. I continue to cherish every time we speak or meet. Wishing you… — Virat Kohli (@imVkohli) June 12, 2026

विराट कोहली आणि केन विल्यमसन हे आधुनिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जातात. दोघांमधील स्पर्धा मैदानावर रंगली असली तरी मैदानाबाहेर त्यांच्यातील मैत्रीही तितकीच मजबूत राहिली आहे. खेळाडू आणि कर्णधार म्हणून विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास जवळपास एकाच वेळी सुरू झाला आणि संपला. दोघांनीही आपापल्या संघांना देशात आणि परदेशात मोठे यश मिळवून दिले. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली, न्यूझीलंडने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पराभूत करून २०२१ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकला.

विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या केन विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेटला नवी उंची दिली. केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक शतक करणारा खेळाडू आहे. त्याने ३७८ सामन्यांतील ४५२ डावांत १९,३४६ धावा करत देशाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला. त्याच्या नावावर ४८ शतके आणि १०३ अर्धशतके आहेत. न्यूझीलंडला २०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती. या किवी दिग्गजाने ११० कसोटी सामन्यांतील १९५ डावांमध्ये ९,५१५ धावा केल्या आहेत, ज्यात ३३ शतके आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने १७५ एकदिवसीय सामन्यांतील १६७ डावांमध्ये ७,२५६ धावा केल्या आहेत, ज्यात १५ शतके आणि ४७ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, त्याने ९३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ९० डावांमध्ये २,५७५ धावा केल्या आहेत, ज्यात १८ अर्धशतकांचा समावेश आहे.

क्रिकेटविश्वातील एका युगाचा अंत

विल्यमसनच्या निवृत्तीमुळे आधुनिक क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जो रूट, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली आणि केन विल्यमसन या ‘फॅब फोर’मधील सर्वाधिक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून त्याची ओळख होती.

IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?

Web Title: Virat kohli emotional post on kane williamson retirement new zealand cricket legend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • kane williamson
  • Social Media
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Kane Williamson Retairment: १६ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीचा अंत! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
1

Kane Williamson Retairment: १६ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीचा अंत! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती

Raj Thackeray: राज ठाकरेंची मनसैनिकांना मोठी साद; ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका, पण…’, सोशल मीडियावरील पोस्ट Viral
2

Raj Thackeray: राज ठाकरेंची मनसैनिकांना मोठी साद; ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका, पण…’, सोशल मीडियावरील पोस्ट Viral

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
3

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Virat Kohli ने पाडला पैशांचा पाऊस! तब्बल 3,542 कोटींसह देशात श्रीमंत सेलिब्रिटी; शाहरुख-धोनीही मागे
4

Virat Kohli ने पाडला पैशांचा पाऊस! तब्बल 3,542 कोटींसह देशात श्रीमंत सेलिब्रिटी; शाहरुख-धोनीही मागे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.