Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: ‘गेल्या वर्षी स्वतःला एक प्रश्न विचारला होता…’; RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली भावूक, शेअर केली पोस्ट

Virat Kohli Shared Instagram Post After RCB Win: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 06:55 PM
photo- Instagram(Virat Kohli)

photo- Instagram(Virat Kohli)

Follow Us
Follow Us:
  • RCB चा सलग दुसरा किताब
  • विराट कोहली भावुक
  • सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (दि.३१) खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा ६ विकेट्सने पराभव केला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएल 2026 चे विजेतेपद पटकावले. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकून ऐतिहासिक विक्रम केला. या विजयानंतर संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सामन्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली.

RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज

विराटची भावनिक इंस्टाग्राम पोस्ट

विराट कोहील १९ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भाग आहे. आपल्या पहिल्या IPL ट्रॉफीसाठी अनेक वर्षांपासून वाट पाहणारा आरसीबीचा दिग्गज खेळाडू विराट कोहली, सलग दुसऱ्या विजयानंतर भावूक झाला. हा विजय त्याच्यासाठी किती महत्त्वाचा अन् खास आहे, हे त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून व्यक्त केले.

विराट कोहलीने संघातील काही खेळाडू आणि ट्रॉफीसोबतचे चार वेगवेगळे फोटो पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की “गेल्या वर्षी आम्ही स्वतःला प्रश्न विचारला होता की, आपण सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकू शकतो का? आणि आज आम्ही इथे आहोत.” कोहलीची ही पोस्ट काही मिनिटांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. लाखो चाहत्यांनी पोस्टवर प्रतिक्रिया देत RCB आणि कोहलीचे अभिनंदन केले.

अंतिम सामन्यात विराटची दमदार खेळी

गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची शानदार खेळी केली. त्याने शेवटचा विजयी षटकार ठोकत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा क्षण पाहून स्टेडियममधील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. सामना संपताच विराटने मैदानात सेलिब्रेशन केले. गेल्या वर्षी संघाच्या विजयात कोहलीच्या दमदार कामगिरीचा मोलाचा वाटा होता. या हंगामातही तो संघात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १६ सामन्यांमध्ये ६७५ धावा केल्या. या हंगामात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली. हा कोहलीचा सलग चौथा हंगाम होता, ज्यात त्याने ६०० पेक्षा जास्त धावा केल्या.

RCB चा सलग दुसरा किताब

२०२५ मध्ये १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत RCB ने पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर 2026 मध्ये पुन्हा ट्रॉफी जिंकत संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) याच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केली.

Suvendu Adhikari Cabinet: बाऊन्सर टाकणारा गोलंदाज विरोधकांना करणार ‘क्लिन बोल्ड’; बंगाल सरकारमध्ये घेतली मंत्रिपदाची शपथ

Web Title: Virat kohli instagram post after rcb win ipl 2026 twice cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Rajat Patidar
  • Royal Challengers Bengaluru
  • Virat Kohli

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.