फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली-नितेश कुमार : काल पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ भारताच्या खात्यात दोन सुवर्ण पदकांची कमाई झाली. यामध्ये सुमित अंतील आणि नितेश कुमार यांनी गोल्ड मेडल नावावर केले आहे. भारताचा नितेश कुमार याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेल याला २१-१४, १८-२१ आणि २३-२१ असा पराभव करून सामना जिंकला. अत्यंत रोमांचक सामना झाला, शेवटपर्यत सामन्यामध्ये कोण विजयी होणार हे ठरवणं कठीण झालं होत. याचदरम्यान आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यामध्ये भारताचा अनुभवी स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव गाजताना दिसत आहे. विराट कोहलीचे चाहते हे जगभरामध्ये आहेत. त्याच्या खेळाला आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला लोक पसंत करतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागचं कारण काय हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही नक्कीच अभिमान वाटेल.
काल भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमार याचा सामना सुरु झाला होता, तेव्हा कॉमेंटेटर म्हणत होते की, भारतीय बॅडमिंटन स्टार नितेश कुमार विराट कोहलीला आपला हिरो मानतो. नितेश कुमारच्या सामन्यादरम्यान कॉमेंटेटरने सांगितले की, भारतातील बहुतेक लोक विराट कोहलीला स्पोर्टिंग हिरो म्हणून पाहतात. कॉमेंटेटर म्हणाला की, नितेश कुमारने सांगितले की, त्याचा हिरो विराट कोहली आहे. एक तेजस्वी भारतीय क्रिकेटर, ज्याने यापूर्वी संघाचे नेतृत्वही केले होते. मला वाटते की भारतातील बहुतेक लोक विराट कोहलीला स्पोर्टिंग हिरो म्हणून पाहतात.”
English commentator during the Badminton match at the Paralympics:
“His hero is Virat Kohli. The great Indian cricketer, most people in India have Kohli as a sporting hero”. 🐐pic.twitter.com/TwAWrLIwH2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2024