Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs KKR: लाईव्ह शोमध्ये वीरेंद्र सेहवाग पुन्हा चर्चेत! CSK च्या जखमांवर तिखटाचा मारा.. पहा VIDEO

आयपीएल 2025 मधील 25 व्या सामन्यात चेपॉक मैदानावर कोलकाता नाईट्स रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. या परभवानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जवर टीका केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 12, 2025 | 12:46 PM
CSK vs KKR: Virender Sehwag in the news again in the live show! A sharp blow to CSK's injuries..

CSK vs KKR: Virender Sehwag in the news again in the live show! A sharp blow to CSK's injuries..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs KKR : आयपीएल 2025 मधील 25 व्या सामन्यात चेपॉक मैदानावर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट्स रायडर्स सामना खेळवण्यात आला. या सामन्यात केकेआरने सीएसकेचा दारुण पराभव केला आहे. केकेआरचा हा कर्णधार अजिंक्य रहाणेने नानेफक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर सीएसकेने प्रथम फलंदाजी करत20 षटकांत फक्त 103 धावाच केल्या. प्रतिउत्तरात केकेआरने हे लक्ष्य 11 ओव्हरमध्येच पूर्ण करून विजय संपादन केला. चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग सीझनमधील पाचवा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जवर तिखट टीका केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा अलीकडील हंगाम चांगला चालला नाही. याबद्दल वीरेंद्र सेहवागने धोनीच्या संघाची टर उडवली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान, धोनी १ धाव घेऊन एलबीडब्ल्यू बाद झाला. मात्र, या निर्णयानंतर बराच गोंधळ निर्माण झाला. धोनी आऊट आहे की नाही? यावर वादविवाद सुरू झाला. या सामन्यात चेन्नईचा संघ २० षटकांत फक्त १०३ धावापर्यंतच पोहचू शकला. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने सामना आपल्या नावे केला.

हेही वाचा : CSK vs KKR : खुद्द ‘धोनी रिव्ह्यू सिस्टीम’ अडचणीत, थालाच्याच आऊट असण्या-नसण्यावर गोंधळ, पंचांवर प्रश्नचिन्ह..

वीरेंद्र सेहवागची परखड शैली

स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यानंतरच्या लाईव्ह शोमध्ये जतिन सप्रूकडून सेहवागला विचारण्यात आले की, जर धोनी शेवटपर्यंत राहिला असता तर सीएसकेचा डाव सावरु शकला असता का? यावर वीरेंद्र सेहवागने उत्तर देताना म्हटले की,  ‘जर एमएस धोनी एका धावेवर नाबाद राहिला असता तर चेन्नई सुपर किंग्ज प्रथम फलंदाजी करत जास्तीत जास्त १३० धावा करू शकली असती आणि रात्री १०:३० वाजता शो लाईव्ह होण्याऐवजी वेळ रात्री ११:३० झाली असती. यापेक्षा जास्त काही होऊ शकले नसते. कारण कोलकाताने हा सामना १०.१ षटकांत जिंकला.’

वीरेंद्र सेहवागने मिटवला वाद

वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जच्या वाईट प्रदर्शनावर जोरदार टीका करून वाद मिटवला. सेहवाग त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी चर्चेत असतो. वीरेंद्र सेहवागने त्याच्या ट्रेडमार्क शैलीत ऊतर देताचा  धोनीच्या बाद होण्याचा विषय संपला.

हेही वाचा : IPL 2025 : दिल्लीच्या वादळाचे थैमान, ट्रेंट बोल्टला मैदान सोडून काढावा लागला पळ, ओरडत म्हणाला.. पहा Video

सीएसकेचा लागोपाठ पाचवा पराभव

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात सीएसकेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. काल केकेआरविरुद्ध झालेला पराभव हा त्यांचा सलग पाचवा पराभव ठरला आहे. चेपॉक येथे खेळण्यात आलेल्या सर्वात कमी धावसंख्येमुळे  घरच्या मैदानावर सीएसकेचा सलग तिसरा पराभव झाला.  केकेआरच्या शानदार गोलंदाजीसमोर सीएसकेच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. त्यामुळे सीएसके संघ 103 ढवाच करू शकला आणि केकेआरने २ विकेट गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

 

Web Title: Virender sehwag strongly criticizes csk in live show csk vs kkr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • bcci
  • CSK vs KKR
  • ICC
  • IPL 2025
  • MS Dhoni Captain

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
2

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.