
photo- social media
लॉर्ड्सवर Rohit Sharma चा शेवटचा सामना? निवृत्तीच्या चर्चांवर प्रशिक्षकांचे स्पष्ट उत्तर
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. कार्डिफमधील दुसऱ्या सामन्यादरम्यान भारतीय डावाच्या ३२ व्या षटकात सुंदर फलंदाजीसाठी आला. पुढच्याच षटकात त्याला दुखापत झाली. सुंदरने साकिब महमूदच्या गोलंदाजीवर एक फटका मारला आणि त्यानंतर तो अस्वस्थ वाटला. त्यानंतर मैदानात फिजिओ आले. दरम्यान सुंदरच्या गुडघ्याला पट्टी बांधलेली दिसली. यानंतर, तो जास्त वेळ क्रिजवर टिकू शकला नाही. पुढच्याच चेंडूवर सुंदरने हुक फ्लिक मारण्याचा प्रयत्न केला आणि बाद जाला. त्याने पाच चेंडू खेळून दोन धावा केल्या.सुंदरला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला आहे. याच कारणामुळे तो तो क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करू शकला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी प्रिन्स यादवला संधी दिली.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ५२ धावा करून सुंदरने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आणि अक्षर पटेलने पाचव्या विकेटसाठी १०२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यामुळे भारतीय संघाला ४५.२ षटकांत २५९ धावांचे लक्ष्य गाठण्यास मदत झाली.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाला हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गमवावे लागले. दोघेही सध्या मैदानाबाहेर आहेत. यापूर्वी, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे देखील विविध दुखापतींमुळे संघाबाहेर होते आणि इंग्लंड दौऱ्यात सहभागी होऊ शकले नव्हते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. सध्या मालिकेत दोन्ही संघानी १- १ ने बरोबरीवर आहेत. त्यामुळे हा शेवटचा सामना मालिका विजयासाठी निर्णायक ठरणार आहे.
IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई