भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (फोटो- सोशल मिडिया)
सिरिजमधील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. आजचा चौथा सामना जिंकून सिरिज आपल्या नावावर करणे करणे आणि सिरिजमध्ये आघाडी घेणे, हे भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य असणार आहे. तर वेस्ट इंडिजचा संघ हा सामना जिंकून सिरिजमध्ये २-२ अशी बरोबरी साधण्यासाठी आणि आपली सिरिज जिंकण्याची आशा जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
IND Vs WI: आपला भाऊ इतिहास घडवणार; 79 रन्स अन् Abhishek Sharma करणार ‘हा’ रेकॉर्ड
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. येथील सपाट खेळपट्टीवर चेंडू चांगल्या प्रकारे बॅटवर येत असल्याने फलंदाजांचे मोठे वर्चस्व पाहायला मिळते. त्यामुळे आजच्या सामन्यात रन्सचा पाऊस पडण्याची आणि एक हाय-व्होल्टेज सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता अतिशय नगण्य आहे, ज्यामुळे चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा पूर्ण आनंद घेता येईल. सामन्याच्या दिवशी येथील कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स डी यादव, मयंक यादव, नमन धीर.
वेस्ट इंडिज: शे होप (कर्णधार), कामिल पूरन, अमीर जांगू, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, रोवमन पॉवेल, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, क्वेंटिन सॅम्पसन, अकील हुसैन, शमर जोसेफ, गुडाकेश मोती, कीमो पॉल, मॅथ्यू फोर्ड, शमार स्प्रिंगर.






